सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव मोर, बेलगाव तºहाळे, धामणगाव, टाकेद, गंभीरवाडी, खेड, परदेशवाडी, तातळेवाडी, अधरवड सह वासाळी, खडकेद, सोनोशी, अडसरे परिसरात गेल्या दोन तीन दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून या सतत धारेमुळे भातशेतीला योग्यवेळी पूरक पाऊस पडल्याने या परिसरातील शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.दहा पंधरा दिवसांच्या सुट्टीनंतर ऊन-सावलीच्या खेळानंतर ऐन पितृपक्षात योग्य वेळी पाहिजे त्या मुबलक प्रमाणात जोरदार धो धो पाऊस पडल्याने भातशेतीला मोठा आधार मिळाला आहे.या पूर्व भागातील गरे आणि हाळे या भाताच्या प्रजातीच्या वानाला मोठा दिलासा मिळाल्याने शेतकरी वर्ग समाधानी झाला आहे. सोनम, रूपाली, हाळी पूनम, आर चोविस, गरे, इंद्रायणी, आर/२४, १००८, वाय एस आर, पूनम हळी, सोनम, गरे, हाळे या वानाच्या प्रजातीची भात लागवड केल्याने या व्यतिरिक्त अन्य भाताच्या वाणाच्या प्रजाती भातशेतीला पोषक व पूरक पाऊस पडला आहे.या पर्जन्यवृष्टीमुळे बहुतांश शेतकरी वर्ग भातशेतीला शेवटच्या टप्यात सेंद्रिय व रासायनिक खते सोडत आहे.प्रतिक्रि या.......गेल्या दहा दिवसांच्या कडाक्याच्या उगडीपनंतर दोन तीन दिवसापासून जोरदार स्वरूपात धो धो पडलेल्या अवकाळी पावसामुळे भातशेतीला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. नुकत्याच पडलेल्या पावसामुळे नद्या, नाले पुन्हा दुथडी भरुन वहात आहे.- महेश गाढवे, शेतकरी, धामणगाव.दहा पंधरा दिवस पावसाने उघडीप दिली होती, परंतु ऐन मोसमात योग्यवेळी पितृपक्षात पोटऱ्यात आलेल्या भातशेतीला पोषक व पूरक पाऊस पडल्याने जोमात आलेल्या भातशेतीसह शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.- शिवाजी पाटील मोंढे, शेतकरी अडसरे खुर्द.(फोटो २८ टाकेद)इगतपुरीच्या पूर्व भागात जोरदार पावसामुळे जोमात असलेली भातशेती.
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 18:59 IST
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव मोर, बेलगाव तºहाळे, धामणगाव, टाकेद, गंभीरवाडी, खेड, परदेशवाडी, तातळेवाडी, अधरवड सह वासाळी, खडकेद, सोनोशी, अडसरे परिसरात गेल्या दोन तीन दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून या सतत धारेमुळे भातशेतीला योग्यवेळी पूरक पाऊस पडल्याने या परिसरातील शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात जोरदार पाऊस
ठळक मुद्देशेतकरी वर्गात समाधान : भाताला पुरक असलेल्या पावसामुळे नाराजी दूर