शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

अभोणा परिसरात तासभर जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 00:30 IST

दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि.२५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर कोसळलेल्या या पावसाने कोमेजून गेलेल्या खरिपाच्या पिकांना दिलासा मिळणार आहे.

ठळक मुद्देपिकांना जीवदान : बळीराजा आनंदला; चणकापूर धरणात ५२३ दलघफू साठा

अभोणा : दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि.२५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर कोसळलेल्या या पावसाने कोमेजून गेलेल्या खरिपाच्या पिकांना दिलासा मिळणार आहे.जूनच्या प्रारंभीच निसर्ग चक्रीवादळामुळे सलग तीन दिवस पावसाची संततधार सुरू होती. या पावसावर शेतकऱ्यांनी मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली, तर पश्चिम आदिवासी पट्ट्यात भात, नागलीची रोपे टाकण्यात आली होती. समाधानकारक पावसाने खरीप पिकांसह रोपेही जोमात होती. मात्र गत पंधरवड्यापासून पावसाने ओढ दिल्याने पिके वाळू लागली होती.भात, नागलीची रोपेही पिवळी पडू लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. मात्र शनिवार झालेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. दरम्यान, शनिवारी १८ मिमी पावसाची नोंद झाली, तालुक्यात आत्तापर्यंत २७९ मिमि पाऊस झाला. चणकापूर धरणक्षेत्रात २५ मिमी पाऊस झाला असून, आत्तापर्यंत २७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजमितीस धरणात ५२३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. अभोणा मंडलामध्ये ३५ मिमी पाऊस पडला.या पावसाने शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते. गावातील सिमेंटच्या रस्त्याला ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामपालिका प्रशासनाने तत्काळ खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी केलीआहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसFarmerशेतकरी