उघडपीनंतर जोरदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 13:45 IST2017-07-19T13:45:54+5:302017-07-19T13:45:54+5:30
तीन दिवसांपासून उघडीप दिलेल्या वरुणराजाने बुधवारी (दि.१९) शहरासह उपनगरीय भागात जोरदार हजेरी लावली.

उघडपीनंतर जोरदार हजेरी
लोकमत आॅनलाइन
नाशिक : तीन दिवसांपासून उघडीप दिलेल्या वरुणराजाने बुधवारी (दि.१९) शहरासह उपनगरीय भागात जोरदार हजेरी लावली. पंचवटी, जुने नाशिक, सातपूर, सीबीएस, मुंबईनाका, उंटवाडी, पाथर्डी, मखमलाबाद, म्हसरूळ आदि परिसरात जोरदार पावसाला सुरूवात झाली. बुधवारचा आठवडे बाजार असल्यामुळे सकाळपासून बाजार गजबजला होता. गोदावरीलचे पाणी ओसरल्याने आठवडे बाजार भरला. ग्राहक विक्रेत्यांची बाजारात गर्दी झाली असताना अचानकपणे एक वाजेच्या सुमारास आलेल्या जोरदार पावसाने बाजारात तारांबळ उडाली. मागील दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती. शहरातील काही भागांमध्ये जोरदार पावसाला सुरूवात झाल्याने आनंद व्यक्त होत आहे.