शहर तापले : पालिकेच्या कोरड पडलेल्या पाणपोर्इंनाच श्रध्दांजली !
By Admin | Updated: April 13, 2017 15:55 IST2017-04-13T14:36:44+5:302017-04-13T15:55:01+5:30
महापालिकेच्या कोरड्याठाक पडलेल्या पाणपोर्इंना सत्ता बदलानंतरही अद्याप ‘अच्छे दिन’ येऊ शकलेले नाही.

शहर तापले : पालिकेच्या कोरड पडलेल्या पाणपोर्इंनाच श्रध्दांजली !
नाशिक : एकीकडे शहराचे वातावरण दिवसेंदिवस उष्ण होत असून नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे; मात्र दुसरीकडे महापालिकेच्या कोरड्याठाक पडलेल्या पाणपोर्इंना सत्ता बदलानंतरही अद्याप ‘अच्छे दिन’ येऊ शकलेले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने शहरातील पाणपोई मृत झाल्याचे घोषित करत त्यांना श्रध्दांजली वाहिली.
गेल्या महिन्यात शहराचे तपमान सलग तीन दिवस ४०.३ अंशावर स्थिरावले होते. यावेळी शिवसेनेच्या वतीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांक डे निवेदनाद्वारे शहरातील पाणपाईंची दुरवस्था थांबवून त्याचा उपयोग नागरिकांना करून देण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, ‘लोकमत’ने देखील शहरामधील विविध चौकांमध्ये केवळ शोभेपुरत्या उरलेल्या पाणपार्इंच्या छायाचित्रांसह वृत्त प्रसिध्द करून पालिक ा प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. ज्या दिवशी हे वृत्त प्रसिध्द झाले त्याच दिवशी शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’च्या प्रतीसह निवेदन अधिकाऱ्यांना सादर करत पाणपोई दुरूस्त कराव्या, अन्यथा श्रध्दांजली वाहण्याचा इशारा दिला होता. यानुसार शहराच्या वर्दळीच्या ठिकाण समजल्या जाणाऱ्या एमजीरोडवरील महापालिकेच्या पाणपोईला कार्यकर्त्यांना गुरूवारी (दि.१३) पुष्पचर्क अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. यावेळी शिवसेनेचे सचिन बांडे, उमेश चव्हाण, नाना काळे, राजू राठोड, सुनील जाधव आदि उपस्थित होते. यावेळी पाणपोईवर ‘भावपूर्ण श्रध्दांजली’चा फलकही लावण्यात आला.