ह्रदयद्रावक : काकाने अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करून आवळला गळा

By Admin | Updated: April 24, 2017 22:18 IST2017-04-24T22:18:28+5:302017-04-24T22:18:28+5:30

या क्रुरकर्म्याने त्यानंतर चिमुरडीचा तारेने गळा आवळून खून केल्याची ह्रदयद्रावक व माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.

Heartbreak: Kaka assaulted minor prostitute and raped her | ह्रदयद्रावक : काकाने अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करून आवळला गळा

ह्रदयद्रावक : काकाने अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करून आवळला गळा

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील सापुतारा रस्त्यावर असलेल्या माळे दुमाला येथे भर दिवसा काकाने आपल्या सातवर्षीय पुतणीला फूस लावून घरात बोलविले व तिच्यावर लैंंगिक अत्याचार केला. या क्रुरकर्म्याने त्यानंतर चिमुरडीचा तारेने गळा आवळून खून केल्याची ह्रदयद्रावक व माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.
याबाबत वणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माळे दुमाला या ठिकाणी भरदिवसा एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर विलास आण्णासाहेब महाले (३०) याने बलात्कार करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन फरार झालेल्या संशयित आरोपी महालेच्या शोधात पथक रवाना केले. पोलिसांनी महालेच्या बोरगाव जवळ मुसक्या आवळल्या. वणीपासून दहा किलोमीटर अंतरावर माळे दुमाला हे गाव आहे. गावात धार्मिक कार्यक्रम सुरू असल्याने सर्व गावकरी तेथे जमले होते. यावेळी या क्रुरकर्मा काकाने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले. पिडित मुलीच्या आई-वडिलांनी याबाबत वणी पोलीस ठाण्यात संशयित महालेविरुध्द फिर्याद दिली असून पोलिसांनी बलात्कार व खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
संशयिताने चिमुरडीचा अल्युमिनीअम तारेच्या सहायाने गळा आवळुन खून केल्यानंतर घरात अडगळीच्या ठिकाणी कचऱ्याच्या टोपली खाली मृतदेह झाकुन ठेवला आणि संशयीत आरोपी घरास कुलुप लावुन पळून गेला होता. वणी पोलीसांनी स्थानिक
गुन्हे अन्वेशन विभाग नाशिक ला माहिती दिली. त्यानुसार त्यांनी आरोपीच्या
मोबाईलचे लोकेशन घेवुन संशयीत आरोपीला बोरगांव येथे स्थानिक गुन्हे
अन्वेशन विभाग नाशिक यांनी ताब्यात घेतले आहे वणी पोलीस ठाण्यात पिडीत
मुलीच्या संतप्त नातेवाईकांनी व गांवक-यानी पोलीस ठाण्यात ठिया मांडला.

Web Title: Heartbreak: Kaka assaulted minor prostitute and raped her