शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

सुनावणी : नाशिकच्या सोमेश्वर देवस्थानचे दप्तर जमा करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 13:38 IST

यासंदर्भात नव्या ट्रस्टींनी सहायक धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी मुरलीधर पाटील यांना निर्देश दिल्यानंतरही त्यांनी दखल घेतली नाही.

ठळक मुद्देयेत्या ४ डिसेंबरला धर्मादाय आयुक्त कार्यालयात दप्तर जमा करण्याचे आदेश नव्या ट्रस्टींनी सहायक धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार

नाशिक : सोमेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये नवनियुक्त ट्रस्टी तसेच पदाधिकारी आणि माजी अध्यक्षांचा वाद सुरूच असून, या प्रकरणी मंगळवारी (दि. २८) सहायक धर्मादाय आयुक्तांकडे झालेल्या सुनावणीनंतर मुरलीधर पाटील यांना येत्या ४ डिसेंबरला धर्मादाय आयुक्त कार्यालयात दप्तर जमा करण्याचे आदेश सहायक धर्मादाय आयुक्तांनी दिले. पाटील यांनी मात्र अशा प्रकारचे कोणतेही आदेश दिले नसल्याचा दावा केला असून, पुढील सुनावणीची तारीख देण्यात आल्याचे सांगितले.सोमेश्वर देवस्थानवर नवीन ट्रस्टी नियुक्त करण्यात आले आणि त्यातून अध्यक्ष तसेच अन्य पदाधिका-यांची निवड झाली. मात्र मावळते अध्यक्ष मुरलीधर पाटील नव्या ट्रस्टींना दाद देत नसून त्यांनी आॅफिस तसेच दप्तराचा ताबा दिलेला नाही. यासंदर्भात नव्या ट्रस्टींनी सहायक धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी मुरलीधर पाटील यांना निर्देश दिल्यानंतरही त्यांनी दखल घेतली नाही. उलट २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता बैठक बोलावून नव्या विश्वस्तांना कार्यभार देण्याचे पत्र स्वत: अध्यक्ष असल्याच्या नात्याने दिले आणि तेथे बैठकीत कार्यभार तर दिला नाहीच उलट गुंड प्रवृत्तीचे लोक आणून धमकावल्याची तक्रार नव्या ट्रस्टींमधील अध्यक्ष प्रमोद गो-हे, सरचिटणीस बापूसाहेब तिवारी, खजिनदार गोकुळ पाटील, हरिश्चंद्र मोगल, अविनाश पाटील, राहुल बर्वे व श्यामसिंग परदेशी यांनी पोलीस आयुक्त तसेच सहायक धर्मादाय आयुक्तांकडे केली होती. त्या आधारे मंगळवारी सहायक धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी झाली.

टॅग्स :NashikनाशिकTempleमंदिरOrder orderआदेश केणेgodavariगोदावरी