बाजार सुना-सुना !
By Admin | Updated: July 2, 2017 00:55 IST2017-07-02T00:54:15+5:302017-07-02T00:55:07+5:30
जीएसटीचा पहिला दिवस : कुठे समाधान, तर कुठे नाराजी; व्यवहार मंदावले

बाजार सुना-सुना !
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मध्यरात्री बारा वाजेपासून केंद्र सरकारकडून वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीची घोषणा संसदेच्या सभागृहात करण्यात आली. करप्रणाली व अर्थव्यवस्थेमधील सर्वांत मोठा असा ऐतिहासिक बदल ‘जीएसटी’च्या रूपाने पहावयास मिळाला. या बदलाचा प्रभाव शहरातील बाजारपेठेत शनिवारी (दि.१) दिवसभर पहावयास मिळाला. ‘वीकेण्ड’लाही कॉलेजरोडवरील बहुतांश रेस्टॉरंटपासून ते किराणा मालाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रविवार कारंजापर्यंत दुकानांमध्ये सामसूम वातावरण होते.
‘जीएसटी’मुळे वातानुकूलित रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आस्वाद महागला असल्याने कॉलेजरोड, गंगापूररोडसह मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये शुकशुकाट होता. त्याचप्रमाणे रविवार कारंजा, अशोकस्तंभ, सराफ बाजार परिसरातही तुरळक गर्दी दिसून आली.
जीएसटीमुळे कॅनडा कॉर्नरवरील एका सराफ व्यावसायिकाने दुकान बंद ठेवले होते. कुठे ‘कॉफी’ स्वस्त, तर कुठे महागशहरातील ‘कॅफे कॉफी डे’मध्ये १९.५ टक्के कर आकारणी एकूण बिलावर केली जात होती; मात्र आता जीएसटीच्या रूपाने १८ टक्के कर आकारणी करण्यात येत आहे. शहरामध्ये एकूण सहा आउटलेट असून, या सर्व ठिकाणी जीएसटीनुसार १८ टक्के कर आकारणी
क रण्यास सुरुवात केल्याचे येथील व्यवस्थापकांनी सांगितले. तसेच शहरातील विविध रेस्टॉरंटमध्येही १८ टक्क्यांनुसार जीएसटी एकूण बिलावर आकारला जात आहे. त्यामुळे रेस्टॉरंटमध्ये भोजनासह कॉफीदेखील महागल्याचे चित्र आहे. उदाहरणार्थ एक कॉफीचा कप जर तीस रुपयांपर्यंत या अगोदर रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध होत होता, तर त्यावर १८ टक्क्यांनुसार आता ग्राहकांना जीएसटीचा कर द्यावा लागत आहे.