आरोग्य विद्यापीठाच्या बोधचिन्हाची निवड
By Admin | Updated: July 5, 2014 00:24 IST2014-07-05T00:09:43+5:302014-07-05T00:24:56+5:30
आरोग्य विद्यापीठाच्या बोधचिन्हाची निवड

आरोग्य विद्यापीठाच्या बोधचिन्हाची निवड
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नवीन बोधचिन्ह स्पर्धेतून निवडण्यात आले आहे. विद्यापीठाने घेतलेल्या लोगो स्पर्धेतून दाखल झालेल्या ३०० प्रवेशिकांमधून पुण्याच्या ओम चिंचवणकर यांनी तयार केलेल्या बोधचिन्हाची निवड करण्यात आली आहे. चिन्ह निवडीसाठी तयार करण्यात आलेल्या निवड समितीने बोधचिन्हाची निवड केली. प्रथम छाननीतून १०० त्यानंतर ५० आणि नंतर १२ प्रवेशिकांमधून अंतिम फेरीत चार बोधचिन्हांची निवड करण्यात आली. त्यातून चिंचवणकर यांचे बोधचिन्ह निश्चित करण्यात आले. चिंचवणकर यास ५० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि पारितोषिक देऊन एका विशेष समारंभात गौरविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)