शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदार, भाजी विक्रेत्यांचे होणार आरोग्य सर्वेक्षण; कोरोनाची संभाव्य दुसरी लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 07:01 IST

छोट्या व्यावसायिक गटांमध्ये किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, पदपथ विक्रेते, छोटे हॉटेलचालक, टपरीचालक, वेटर, घर कामगार यांचा समावेश राहणार आहे.

नाशिक : कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना कितीही वाढला तरी ज्या व्यावसायिकांशी नागरिकांचा संपर्क येतो, त्यांचे प्रशासनाच्या माध्यमातून लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार आहे.   सर्वाधिक संपर्क येणाऱ्या व्यावसायिक गटांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाकडून कोणत्या व्यावसायिकांचे सर्वेक्षण करायचे, त्याबाबत स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले. त्यात छोट्या व्यावसायिक गटांमध्ये किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, पदपथ विक्रेते, छोटे हॉटेलचालक, टपरीचालक, वेटर, घर कामगार यांचा समावेश राहणार आहे.

घरगुती सेवा पुरवणाऱ्यांपैकी दूध घरपोच करणारे दूधविक्रेते, घरकाम करणाऱ्या महिला, घरगुती नोकर, गॅस सिलिंडर वाटप करणारे कर्मचारी, इलेक्ट्रिक वस्तू विक्रेते, दुरुस्ती करणारे मेकॅनिक, नळजोडणी करणारे प्लंबर, लॉन्ड्री, ड्रायव्हर्स, टेम्पोचालक यांच्यासह हमाली, रंगकाम करणारे आणि बांधकाम करणारे मजूर तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ड्रायव्हर, कंडक्टर आणि अन्य कर्मचारी, हाउसिंग सोसायटीत राहणारे सिक्युरिटी गार्ड, सुरक्षारक्षक, अत्यावश्यक सेवा पुरवणारे शासकीय, निमशासकीय कर्मचारी, पोलीस, होमगार्ड अशा विविध गटांतील नागरिकांचा त्यात समावेश केला जाणार आहे.

या नागरिकांचे समूह स्वरूपात सर्वेक्षण केल्यास कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध घालणे शक्य होणार आहे. त्यासाठी नियोजनबद्धपणे या व्यावसायिकांच्या समूहाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. दैनंदिन प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात किमान ५० टक्के नमुने हे या गटातील व्यक्तींचे असावेत, यादृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस