आरोग्य उपकेंद्रनिहाय लसीकरण मोहीम इगतपुरीत राबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 05:21 PM2021-04-11T17:21:22+5:302021-04-11T17:22:29+5:30

घोटी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने इगतपुरी तालुक्यासारख्या ग्रामीण भागातही आरोग्य उपकेंद्रनिहाय लसीकरण केंद्र सुरू करून व्हॅक्सीनच्या लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी केली जात आहे.

Health sub-center wise vaccination campaign should be carried out in Igatpuri | आरोग्य उपकेंद्रनिहाय लसीकरण मोहीम इगतपुरीत राबवावी

आरोग्य उपकेंद्रनिहाय लसीकरण मोहीम इगतपुरीत राबवावी

Next
ठळक मुद्देग्रामीण भागातही प्रादुर्भाव वाढू लागल्याने सर्वत्र चिंतेची बाब

घोटी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने इगतपुरी तालुक्यासारख्या ग्रामीण भागातही आरोग्य उपकेंद्रनिहाय लसीकरण केंद्र सुरू करून व्हॅक्सीनच्या लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, ग्रामीण भागातही प्रादुर्भाव वाढू लागल्याने सर्वत्र चिंतेची बाब आहे. त्यामुळे ग्रामसेवकांनी मुख्यालयी थांबून उपाययोजनांबाबत जनजागृती करावी. बाहेरजिल्ह्यातून गावात आलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत कार्यवाही करावी. प्रत्येक गावात लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठीही जनजागृती करावी, गावगावांत करोनाबाबत लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांची टेस्ट करून घेण्याबाबत प्रबोधन करण्याची मागणी इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापती विमल तोकडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
चार जिल्ह्यांची सीमारेषा असलेल्या इगतपुरी तालुक्यात कामानिमित्त नागरिकांची रहदारी कायम असते. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोना पसरला आहे. यावर मात करण्यासाठी उपाययोजनांबरोबरच जनजागृती करणेही अत्यावश्यक आहे. शासन टेस्ट, ट्रेसिंग व ट्रीटमेंट ही मोहीम राबवित असताना नागरिकांनीही दक्षता घेत शासन नियमांचे पालन करणे, उपाययोजनांची अंमलबजावणी करणे, मास्क लावणे, हात धुणे व फिजिकल डिस्टसिंगचे पालन करणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Health sub-center wise vaccination campaign should be carried out in Igatpuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.