आरोग्य विद्याशाखेच्या परीक्षा ४ ऑगस्टपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 03:19 IST2020-07-04T03:19:32+5:302020-07-04T03:19:32+5:30

१६ जुलै पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता ४ ऑगस्टपासून होणार आहेत.

Health faculty exams from 4th August | आरोग्य विद्याशाखेच्या परीक्षा ४ ऑगस्टपासून

आरोग्य विद्याशाखेच्या परीक्षा ४ ऑगस्टपासून

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी १६ जुलै पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता ४ ऑगस्टपासून होणार आहेत.

वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आहे. बी.एस्सी इन पॅरामेडिकल टेक्नोलॉजी, डिप्लोमा इन पॅरामेडिकल टेक्नोलॉजी, मास्टर इन पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन, एम.बी.ए. (हेल्थ केअर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन), एम.एस्सी. (फार्मा. मेडिसीन), पी.जी.डी.एम.एल.टी., बॅचलर इन आॅप्टोमेट्री, डिप्लोमा इन आॅप्टोमेट्री, डिप्लोमा इन आॅप्थालमिक, सर्टीफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी या अभ्यासक्रमांच्या लेखीपरीक्षा १८ आॅगस्ट पासून आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा १८ आॅगस्टपासून होतील.

Web Title: Health faculty exams from 4th August

टॅग्स :examपरीक्षा