काविळ दिनानिमित्त आरोग्यवर्धक समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:14 IST2021-07-30T04:14:17+5:302021-07-30T04:14:17+5:30
संस्थेचे सचिव राजेश गडाख यांच्या संकल्पनेतून व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक उदय कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक सागर भालेराव, ...

काविळ दिनानिमित्त आरोग्यवर्धक समुपदेशन
संस्थेचे सचिव राजेश गडाख यांच्या संकल्पनेतून व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक उदय कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक सागर भालेराव, गणेश सुके, वृषाली जाधव, जिजाबाई ताडगे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कुदळे यांनी प्रास्ताविकात शाळेतील विविध उपक्रमांची माहिती सांगितली. नाशिक येथील विश्वमंगल आयुर्वेद संचालक डॉ. राजेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी व पालकांना स्लाईड शोच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन केले. सागर भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणासाठी गणेश सुके यांनी काम पाहिले. जिजाबाई ताडगे यांनी आभार मानले.
यावेळी सोमनाथ थेटे, बापू चतुर, भास्कर गुरुळे, पांडुरंग लोहकरे, जयश्री सोनजे, वृषाली जाधव, सतीश बनसोडे, अमोल पवार, मंदा नागरे, कविता शिंदे, सुधाकर कोकाटे, पद्मा गडाख, योगेश चव्हाणके, नीलेश मुळे, शिवाजी कांदळकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.