सातपूर येथे आरोग्य तपासणी
By Admin | Updated: March 18, 2016 23:57 IST2016-03-18T23:48:04+5:302016-03-18T23:57:12+5:30
सातपूर येथे आरोग्य तपासणी

सातपूर येथे आरोग्य तपासणी
सातपूर : महानगरपालिका, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, सातपूर कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य अभियानांतर्गत गरोदर महिला, बालके व ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
महाराष्ट्र हौसिंग कॉलनी येथील महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित मोफत तपासणी शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून सभागृह नेते सलीम शेख, प्रभाग सभापती उषा शेळके, बालरोगतज्ज्ञ डॉ. विनोद पावसकर, चंद्रकांत शिंदे, योगीता दामले आदि उपस्थित होते. प्रास्ताविक केंद्रप्रमुख डॉ. जयश्री नामपूरकर यांनी केले. स्वागत व सूत्रसंचालन रोहिणी जोशी यांनी केले. डॉ. अश्विनी पवार यांनी मानले. बालरोगतज्ज्ञ डॉ. विनोद पावसकर यांच्या नेतृत्वाखाली बालकांची तपासणी करण्यात आली.
तसेच या शिबिरात रक्तातील साखरेचे प्रमाण, हिमोग्लोबिन, रक्तगट आदि तपासण्या करण्यात आल्या. यावेळी नीलकंठ पितृभक्त, पंकज अहेर, सुभाष गवळी, लक्ष्मण गोतरणे, आम्रपाली वावरे, सविता तायडे, पूनम धोपे, निशा जाधव, पल्लवी सोनवणे, धनश्री दंडगव्हाळ, उज्ज्वला सोनवणे उपस्थित होते. (वार्ताहर)