मुलूखवाडीत आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 00:12 IST2021-05-23T00:12:04+5:302021-05-23T00:12:47+5:30
खर्डे : देवळा तालुक्यातील मुलूखवाडी येथील विलगीकरणात असलेल्या रुग्णांबरोबरच गावातील कुटुंबातील सदस्यांची शनिवारी (दि.२२) वैद्यकीय अधिकारी डॉ. अलका सपकाळे यांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी करण्यात आली.

मुलूखवाडी येथे आरोग्य तपासणी करताना वैद्यकीय अधिकारी डॉ. अलका सपकाळेसमवेत आरोग्य सेवक पाटील, श्रीमती निकम आदी.
खर्डे : देवळा तालुक्यातील मुलूखवाडी येथील विलगीकरणात असलेल्या रुग्णांबरोबरच गावातील कुटुंबातील सदस्यांची शनिवारी (दि.२२) वैद्यकीय अधिकारी डॉ. अलका सपकाळे यांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी करण्यात आली.
खर्डे ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या मुलूखवाडी गावात कोरोनाबाधित रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर आढळून आली होती. आरोग्य विभागाने बाधित रुग्णांना होमआयसोलेशनचा सल्ला दिला होता. या रुग्णांची शनिवारी खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अलका सपकाळे व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन काळजी घेण्याचा सल्ला दिला. त्याचप्रमाणे गावातील इतर कुटुंबातील सदस्यांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली. याठिकाणी बाधित रुग्णसंख्या कमी झाली असून, नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत नसल्याने गावाने कोरोनामुक्तीकडे वाटचाल केल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.