अंबड पोलीस स्टेशन येथे आरोग्य तपासणी

By Admin | Updated: November 30, 2015 22:54 IST2015-11-30T22:53:48+5:302015-11-30T22:54:35+5:30

अंबड पोलीस स्टेशन येथे आरोग्य तपासणी

Health check up at Ambad police station | अंबड पोलीस स्टेशन येथे आरोग्य तपासणी

अंबड पोलीस स्टेशन येथे आरोग्य तपासणी

सिडको : शहीद दिनानिमित्त अंबड पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा शुभारंभ पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते करण्यात आला.
पोलिसांचा वाढता ताणतणाव व वेळी अवेळी जेवण करणे याबरोबरच कामकाजामुळे तब्यतीकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक पोलिसांना आजाराचा सामना करावा लागतो. पोलिसांनी कामकाज करताना आपल्या आरोग्याचीही काळजी घेण्याची गरज असल्याचे पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले. या शिबिरात डॉ. अरविंद पगार, डॉ. दिनेश देसले, डॉ. वैभव महाले, डॉ. पराग बऱ्हाटे, रुतूजा पडवळ यांनी रुग्णांची तपासणी केली. पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, धनराज भोई, समाधान वाघ, डी. डी. इंगोले, विशाल मुळे, सुमेद सोनोने, वैशाली शिंदे, सचिन सुपले, टॉम पवार, बापू देव आदिंसह पोलीस कर्मचारी या शिबिरात सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Health check up at Ambad police station