शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्राचे काम पाडले बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 22:54 IST

पाटोदा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत प्रहार संघटनेने काम बंद पाडले. पाटोदा येथे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व त्यासाठी तीन कोटी पाच लाख रुपये निधी मंजूर असलेला सुसज्ज अशा रुग्णालयाच्या इमारतीचे पायाभरणीचे काम सुरू आहे. प्रहार शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष रामभाऊ नाईकवाडी यांनी इमारतीच्या पायाभरणीच्या कामाची पाहणी केली. त्यात सिमेंट व वाळू वापरत नसल्याचे लक्षात आल्याने सुरू असलेले निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप करत बंद पाडले.

ठळक मुद्देसदर ठेकेदार ठरावीक मापदंडानुसार काम करत नसून काम बंद करण्याच्या सूचना दिल्या

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत प्रहार संघटनेने काम बंद पाडले.पाटोदा येथे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व त्यासाठी तीन कोटी पाच लाख रुपये निधी मंजूर असलेला सुसज्ज अशा रुग्णालयाच्या इमारतीचे पायाभरणीचे काम सुरू आहे. प्रहार शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष रामभाऊ नाईकवाडी यांनी इमारतीच्या पायाभरणीच्या कामाची पाहणी केली. त्यात सिमेंट व वाळू वापरत नसल्याचे लक्षात आल्याने सुरू असलेले निकृष्ट दर्जाचे कामहोत असल्याचा आरोप करत बंद पाडले.येवला तालुक्यातील राजकीय तसेच आर्थिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या पाटोदा येथील आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे बांधकाम शासकीय निधीतून सुरू आहे. पायाभरणीचे काम निकृष्ट दर्जाचे बांधकाम मटेरिअल वापरत असल्याचे गावातील प्रहारचे जिल्हा कार्याध्यक्ष रामभाऊ नाईकवाडे व शाखाध्यक्ष गोरख निर्मळयांच्या लक्षात आले. त्यांनी इतर कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या मदतीने बांधकामस्थळी जात पाहणी करून सुपरवायझर व ठेकेदार यांना सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असून, कामाच्या प्लॅन इस्टिमेटबाबत विचारणा केली.वास्तविक शासन विकास-कामांसाठी जनसामान्यांच्या करातून आलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम खर्च करते; पण संगनमताने सर्वस्तरीय चळवळीतून मोजकी रक्कम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत असताना असे गैरप्रकार प्रहार संघटना खपवून घेणार नाही, असे रामभाऊ नाईकवाडे, गोरख निर्मळ व हरिभाऊ महाजन यांनी सांगितले.यावेळी सुनील पाचपुते,सरपंच चंद्रकला नाईकवाडे, दिनेश जगताप, रतन बोरणारे, बाळासाहेब बोराडे, सोमनाथ भुसारे, किशोर भोसले, दत्तू बोरणारे व ग्रामस्थ उपस्थित होते. सुपरवायझर निरुत्तर, तर ठेकेदाराची सारवासारव४सदर ठेकेदाराने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने रामभाऊ नाईकवाडे यांनी गटविकास अधिकारी व पंचायत समिती सभापती यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत निकृष्ट कामाबाबत माहिती दिली. सदर ठेकेदार ठरावीक मापदंडानुसार काम करत नसून काम बंद करण्याच्या सूचना दिल्याव कामाची लवकरचपाहणी केली जाईल, असे सांगितले. याबाबत सुपरवायझर निरुत्तर झाला तर ठेकेदाराने सारवासारव केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.अंदाजपत्रकानुसार सदर काम होत नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत सदर ठेकेदारास माहिती देण्यात आली. मात्र त्याने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.- रामभाऊ नाईकवाडे

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागhospitalहॉस्पिटल