शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धर्मादाय रुग्णालयांमध्ये आरोग्यदूत नेमणार : मिसाळ

By सुयोग जोशी | Updated: April 4, 2025 17:49 IST

नाशिक (सुयोग जोशी) : पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयातील घटनेची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या चौकशीत जे कोणी ...

नाशिक (सुयोग जोशी) : पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयातील घटनेची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. राज्यातील कुठल्याही रुग्णालयात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगत बरेच धर्मादाय रुग्णालय सेवा देत नाही, हे खरं आहे. धर्मादाय रुग्णलयांमध्ये एक आरोग्यदूत नेमणार असल्याचेही वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

त्या नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, वक्फ विधेयक पास झाले, याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते. ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना आता न्यायालयात जाता येईल. बऱ्याच तरतुदी बदलण्यात आल्या. त्या विधेयकावर अभ्यास करण्यात आला, चर्चा झाली तर अनेक जणांची मते घेतली गेली. वक्फ कायद्याला काही संघटना विरोध करत असून, लोकशाही आहे, त्यामुळे विरोध होणारच असेही मिसाळ म्हणाल्या.

जिल्हा रुग्णालयातील घटनेबद्दल माहिती नसून त्याबाबत तपास करून माहिती घेण्याचे आश्वासन दिले. तर विद्यापीठ निवडणूक स्थगित झाली असली तरी त्यात काही चुकीचे घडलं असेल मला वाटत नाही, उलट निवडणुका घेणे गरजेचे असते. रिक्षाचालक अरेरावीबाबत काही तक्रारी आल्या तर कारवाई करणार, असे सांगत रिक्षा संघटनांची देखील आम्हाला मदत होत आहे. चुकीच्या रिक्षाचालकांवर ते देखील कारवाई करणार असल्याचे मिसाळ म्हणाल्या.जिल्हा रूग्णालयातील घटनेची चौकशी करणारजिल्हा रूग्णालयातील घडलेली घटना दुर्देवी आहे. शासकीय महाविद्यालये आणि जिल्हा रूग्णालये सलग्नच असतात. त्यामुळे कोणी जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याची गरज नाही. याबाबत अधिक माहिती घेऊन जिल्हा रूग्णालयातील घटनेची चौकशी करणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.