शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

हेडफोन खरेदीच्या बहाण्याने आले; महिला दुकानदाराची सोनसाखळी हिसकावून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 4:18 PM

पंधरवड्यात तीन महिलांना आपले मंगळसुत्र गमवावे लागल्याने पोलिसांच्या कारभाराविषयीदेखील शंका घेतली जात आहे.

ठळक मुद्देहेडफोन खरेदीचा बहाणा हिरावाडीत सोनसाखळी चोरी

नाशिक : इंदिरानगरसह म्हसरूळ, पंचवटी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरट्यांनी चोऱ्याचा धडाका लावल्याने जणू चोरट्यांनी पोलिसांना थेट ‘ओपन चॅलेंज’ केले आहे की काय? अशी चर्चा परिसरात होऊ लागली आहे. म्हसरूळ परिसरात सोनसाखळी चोरीचे सत्र सातत्याने सुरू आहे. पंधरवड्यात तीन महिलांना आपले मंगळसुत्र गमवावे लागल्याने पोलिसांच्या कारभाराविषयीदेखील शंका घेतली जात आहे. हेडफोन खरेदीचा बहाणा करत दुकानात येऊन महिला दुकानदाराच्या गळ्याला हिसका देत सोनसाखळी ओरबाडल्याने  तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.पंवचटी पोलीस ठाण्याचे विभाजन करून म्हसरूळला स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन केले गेले. कारण त्या भागात वाढती लोकसंख्या नवनवीन कॉलन्यांच्या परिसरात गुन्हेगारीची पाळेमुळे घट्ट होऊ लागली होती. स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण झाल्यानंतर म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी संपुष्टात येईल, अशी आशा व्यक्त केली जात होती; मात्र या भागात गुन्हेगारी अधिकच फोफावल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. ऐन निवडणूक आचारसंहिता व सणासुदीच्या काळात सोनसाखळीचोर सर्रासपणे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढताना दिसत आहेत.म्हसरूळ येथे राहणा-या मीना नवनीतलाल त्रिवेदी यांचे म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या इमारतीपासून हाकेच्या अंतरावर दुकान आहे. काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दोघे इसम एका काळया रंगाच्या दुचाकीवरून दुकानासमोर आले. त्यातील एकाने दुकानात येऊन हेडफोन खरेदी करण्याचा बहाणा करत त्रिवेदी यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोनसाखळी बळजबरीने ओरबाडून पळ काढला. याघटनेवरून सोनसाखळी चोरांचे धाडस सहज लक्षात येते. यावरून पोलिसांचे परिसरात कशाप्रकारे वचक आहे, याचाही अंदाज लावता येणे शक्य आहे.पोलीस ठाण्याचे गस्तीपथक कुणीकडेम्हसरूळ पोलीस ठाण्याचे गस्तीपथक, गुन्हे शोध पथक नेमके कुठे अन् काय करीत आहेत? असा सवाल परिसरातील महिलावर्गाकडून उपस्थित केला जात आहे. चोरटे घरे, दुकानांच्या उंबºयावर येऊन सोनसाखळ्या हिसकावून पळ काढू लागल्याने महिलांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. महिलांनी घराबाहेर पडू नये की काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.हिरावाडीत सोनसाखळी चोरीशतपावलीसाठी बाहेर आलेल्या सुनंदा हरी अंबेकर (५३) यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना शनिवारी (दि.१२) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हिरावाडी रोडवरील विधतेनगर परिसरात घडली आहे.

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयWomenमहिला