चाेरी करण्यासाठी गेला अन् तोल जाऊन ठार झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:16 IST2021-09-21T04:16:53+5:302021-09-21T04:16:53+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंदू उर्फ भोला सामा रहासे (रा.मांडवी खुर्द, नंदूरबार) असे मृत तरूणाचे नाव आहे. चंदू रहासे सोमवारी ...

He went to steal and was killed | चाेरी करण्यासाठी गेला अन् तोल जाऊन ठार झाला

चाेरी करण्यासाठी गेला अन् तोल जाऊन ठार झाला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंदू उर्फ भोला सामा रहासे (रा.मांडवी खुर्द, नंदूरबार) असे मृत तरूणाचे नाव आहे. चंदू रहासे सोमवारी (दि.२०) पहाटेच्या सुमारास ट्रॅक्टर हाऊस जवळील नवीन बांधकाम सुरू असलेल्या स्टार लाईन या इमारतीवर लोखंडी सळई - गज चोरी करण्यासाठी गेला होता. चोरी करीत असतांना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तो जमिनीवर कोसळला होता. या घटनेत त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. अन्य साथीदारांनी त्यास काही अंतरावरील महामार्गावर आणून उपचारार्थ घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच ॲटो रिक्षा न मिळाल्याने भीतीपोटी ते पसार झाले. गंभीर अवस्थेत भोलाने अमृत विनायक बिल्डिंग समोरील महामार्गाच्या सबवेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उड्डाणपुलाखालील पोल नं. ७३ ते ७५ दरम्यानच्या झाडाझुडपात पडला. अति रक्तस्त्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी उघडकीस आली. फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी या घटनेची माहिती भद्रकाली पोलिसांना दिल्याने पेट्रोलिंगवर असलेले उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार घटनास्थळी दाखल झाले.

चौकट===

अगोदर खुनाचा संशय

मृताच्या डोक्यास गंभीर मार बसलेला असल्याने प्रथम दर्शनी त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला असता, शितळादेवी मंदिर परिसरात राहणाऱ्या मृताच्या मित्रास गाठून अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. पोलीस तपासातून चोरीचा हा प्रकार समोर आला असून, मृतांच्या साथीदारांची चौकशी सुरू आहे. पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, नवलनाथ तांबे आदींच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Web Title: He went to steal and was killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.