शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जिवावर उदार होत त्याने वाचविला मौल्यवान ऐवज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:57 IST

सोन्याच्या दागिन्यांच्या तारणाच्या मोबदल्यात व्याजाने पैसे देणाऱ्या मुथूट फायनान्स या कंपनीत लूटमारीच्या उद्देशाने शिरलेल्या चौघा दरोडेखोरांनी कंपनी कार्यालयातील कर्मचारी व उपस्थित ग्राहकांना पिस्तुलाचा धाक दाखवित लूटमारीचा आपला इरादा स्पष्ट केल्यानंतरही निव्वळ जिवावर उदार होऊन कंपनीचा सॉफ्टवेअर अभियंता साजू सॅम्युएल या तरुण कर्मचाºयाने दरोडेखोरांशी दोन हात केले. त्यात त्याने निधड्या छातीने तीन गोळ्या झेलल्या. त्याच्या धाडसामुळे मुथूट फायनान्स कंपनीत ठेवलेले हजारो गोरगरिबांचे कोट्यवधी रुपयांचे दागदागिने वाचवून समाजाप्रती आपली कर्तव्यपूर्ती केली.

ठळक मुद्देमुथूट फायनान्सवर दरोडा मुंबईच्या सॉफ्टवेअर अभियंत्याचे दरोडेखोरांशी दोन हात

सिडको : वेळ सकाळी ११ वाजून १५ मिनिटेठिकाण : सिडकोतील उंटवाडीरोडसोन्याच्या दागिन्यांच्या तारणाच्या मोबदल्यात व्याजाने पैसे देणाऱ्या मुथूट फायनान्स या कंपनीत लूटमारीच्या उद्देशाने शिरलेल्या चौघा दरोडेखोरांनी कंपनी कार्यालयातील कर्मचारी व उपस्थित ग्राहकांना पिस्तुलाचा धाक दाखवित लूटमारीचा आपला इरादा स्पष्ट केल्यानंतरही निव्वळ जिवावर उदार होऊन कंपनीचा सॉफ्टवेअर अभियंता साजू सॅम्युएल या तरुण कर्मचाºयाने दरोडेखोरांशी दोन हात केले. त्यात त्याने निधड्या छातीने तीन गोळ्या झेलल्या. त्याच्या धाडसामुळे मुथूट फायनान्स कंपनीत ठेवलेले हजारो गोरगरिबांचे कोट्यवधी रुपयांचे दागदागिने वाचवून समाजाप्रती आपली कर्तव्यपूर्ती केली.नाशिक शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडली. एरव्ही सशस्त्र दरोडेखोर म्हटले की, भल्याभल्यांची गाळण उडते. परंतु शुक्रवारी सिडकोच्या भर वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या सशस्त्र दरोडेखोरीच्या घटनेने शहर सुन्न झाले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करीत चौघा दरोडेखोरांनी दहशत माजविण्यासाठी मुख्य काचेच्या दरवाजावर गोळी झाडली.काच फुटल्याने कार्यालयात जोरदार आवाज होताच, कार्यालयातील कर्मचारी व सोन्याचे दागिने घेऊन मोबदल्यात पैसे घेण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला. परंतुलूटमारीच्या इराद्याने व शस्त्रे घेऊन घुसलेल्या दरोडेखोरांचा मुकाबला करण्याची हिम्मत कोणाचीही झाली नाही. परंतु मुंबईहून खास मुथूट फायनान्सच्या संगणकीय कामातील दोष दूर करण्यासाठी कामासाठी चार दिवसांपूर्वीच नाशकात आलेला सॉफ्टवेअर अभियंता साजू सॅम्युएल या कर्मचाºयाने प्रसंगावधान राखून जवळच असलेल्या सायरनची कळ दाबली. अचानक धोक्याचा इशारा देणारा सायरन वाजू लागताच, दरोडेखोर काहीसे बिथरले व कंपनीचे व्यवस्थापक चंद्रशेखर देशपांडे यांनीच सायरन वाजविल्याचा संशय घेत त्यांच्या दिशेने धावून जात हातातील पिस्तूलाच्या दस्ताने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.जवळच उभ्या असलेल्या साजू सॅम्युएल याने दरोडेखोरांशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, चिडलेल्या दरोडेखोराने समोरून त्यांच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्या. अवघ्या काही क्षणात साजू रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच, दरोडेखोरांनी क्षणाचाही विलंब न लावताच पोबारा केला.खिडकीतून आरडाओरड केल्यानंतर घटनेचा उलगडादरोडेखोरांनी लूट करण्यापूर्वी सर्व कर्मचारी आणि ग्राहकांचेही मोबाइल ताब्यात घेतले होते. लुटीचे संपूर्ण नाट्य संपेपर्यंत मोबाइल दरोडेखोरांच्याच ताब्यात होते. कर्मचाºयावर गोळीबार केल्यानंतर दरोडेखोर पळताना त्यांनी मोबाइल टाकून पळ काढला. दरोडेखोर पळून जाताचा कार्यालयातील कर्मचारी आणि ग्राहकांनी कार्यालयातील खिडकीतून आरडाओरड करीत गोळीबाराविषयी लोकांना सांगितल्यानंतर एकच धावपळ उडाली.घटनेनंतर पोलिसांचे आॅपरेशन माडसांगवी ते ओढा...दरोड्याच्या घटनेनंतर नाशिक पोलिसांनी संशयित दरोडेखोरांचे वर्णन व ते वापरत असलेल्या दुचाकीची माहिती सर्व पोलीस ठाण्यांना कळविताच, पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली. सिडकोतील त्रिमूर्तीचौकाकडून आलेल्या दरोडेखोरांनी जाताना मात्र उंटवाडी पुलाकडून सिटी सेंटर मॉल, गोविंदनगरमार्गे मुंबईनाका व तेथून पुढे पंचवटीतून औरंगाबाद नाक्याकडे पलायन केले.४याच दरम्यान, दरोडेखोरांच्या पाळतीवर असलेल्या आडगाव पोलिसांना तपोवन रस्त्याने दोन दुचाकी भरधाव वेगाने जात असल्याची खबर मिळताच, त्यांनी औरंगाबादरोडने पाठलाग सुरू केला. माडसांगवीपर्यंत पोलिसांनी पाठलाग केला. परंतु संशयितांनी त्यांना चकवा दिला. त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांची सर्च मोहीम परिसरात सुरू होती.४सायंकाळी ६ वाजेनंतर दरोडेखोर मांडसांगवी ते ओढा या दरम्यानच लपून बसल्याची खबर पोलिसांना मिळताच, पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षकांसह शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांनी औरंगाबादरोडला वेढा दिला. ओढ्यानजीकच्या शिंदे मळ्याकडे काही संशयितांना पाहिल्याचे तेथील ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितल्यावर रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयDacoityदरोडा