घरात शिरून महिलेची सोनसाखळी लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:12 IST2021-01-04T04:12:17+5:302021-01-04T04:12:17+5:30

सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या राहत्या घरी संशयित ललवाणी दाम्पत्य १४ नोव्हेंबर, २०२० रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास आले. ...

He entered the house and extended the woman's gold chain | घरात शिरून महिलेची सोनसाखळी लांबविली

घरात शिरून महिलेची सोनसाखळी लांबविली

सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या राहत्या घरी संशयित ललवाणी दाम्पत्य १४ नोव्हेंबर, २०२० रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास आले. त्यांनी मागील कुरापत काढून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी संशयित पायल हिने त्यांना हाताच्या चापटीने मारहाण करत, त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून घेतली. यावेळी सय्यद कुटुंबीयांनी मदतीसाठी पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधला. यावेळी तत्काळ गंगापुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, सहायक निरीक्षक बैसाणे यांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांना समज देत, घटनास्थळावरून हाकलून दिले होते. यानंतर पीडित सय्यद यांनी या प्रकरणी दुसऱ्या दिवशी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित पायलविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापूर्वीही संशयित पायलविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी पुढील तपास हवालदार पठाण हे करीत आहेत.

Web Title: He entered the house and extended the woman's gold chain