‘तो’ शासन निर्णय रद्द करा!

By Admin | Updated: September 22, 2015 22:24 IST2015-09-22T22:24:26+5:302015-09-22T22:24:54+5:30

संतप्त प्रतिक्रिया : मुख्याध्यापक ठरणार अतिरिक्त

'He' Decline Government Decision! | ‘तो’ शासन निर्णय रद्द करा!

‘तो’ शासन निर्णय रद्द करा!

सिन्नर : २८ आॅगस्ट रोजीचा ‘तो’ शासन निर्णय रद्द करा, यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाने शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहे. मागण्या मान्य न झाल्यास शाळाबंद आंदोलन करण्याचा इशारा मुख्याध्यापक संघाने दिला आहे.
तुकडी व्यवस्था बंद न करता २५ विद्यार्थी संख्येच्या एका तुकडीला एकापेक्षा जास्त शिक्षक देण्याची व्यवस्था असावी, अतिरिक्त शिक्षक देण्यासाठी वर्गखोलीची अट नसावी, विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांचे ज्यादा पद मंजूर करण्यात यावे, बहुवर्ग अध्यापन पद्धती नसावी, प्रत्येक विषयानुसार शिक्षक भरती करावी, नवीन शाळा सुरू करताना पहिल्या वर्गासाठी ४० ऐवजी ३० विद्यार्थी संख्येचा निकष असावा, नववी व दहावी मध्ये ३० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास ३०च्या पटीने विद्यार्थी संख्येस एक शिक्षक मंजूर करावा, सहावी ते आठवी व नववी ते दहावी या वर्गांसाठी विद्यार्थी संख्येची अट न देता मुख्याध्यापक पद मंजूर करण्यात यावे, आदि मागण्या मुख्याध्यापक संघाने केल्या आहेत.
२०१३-१४ मध्ये अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे अद्याप समायोजन झालेले नाही, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्त झालेल्या कार्यवाहीला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. मूल्यांकन झालेल्या शाळांना अनुदान नाही, अंशदायी पेन्शनयोजना रद्द करून त्या कर्मचाऱ्यांचे नवीन खाते नियमित केले जात नाही, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवरील बंदी उठविली जात नाही, ग्रंथपालांना समान काम समान वेतन मिळत नाही, शिक्षण हक्क कायदा केंद्राप्रमाणे राज्यात जसाच्या तसा लागू केला नाही तोच राज्य शासनाने २८ आॅगस्टचा जाचक शासन निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप मुख्याध्यापक संघाने केला आहे. शासनाच्या या निर्णयाचा राज्यातील मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी निषेध केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शासनाने २८ आॅगस्टचा तो निर्णय रद्द करावा, अन्यथा २९ सप्टेंबरपासून शाळाबंद आंदोलन करण्याचा इशारा शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांना दिलेल्या निवेदनात मुख्याध्यापक संघाने दिला आहे. याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, एस. बी. सिरसाठ, एस. डी. शेलार, गुफरान अन्सारी, राजेंद्र लोंढे, बी. के. शेवाळे, आर. डी. निकम, के. के. आहिरे, एस. के. सावंत, डी. एस. ठाकरे, साहेबराव कुटे, बी. एम. निकम, डी. बी. कुळधर, ए. एम. गावले, आर. जी. सातपुते, एस. व्ही. रत्नाकर, बी. व्ही. पांडे, एन. आर. देवरे, डी. डी. ह्याळीज आदि मुख्याध्यापक उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: 'He' Decline Government Decision!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.