शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

पेन विकत घ्यायला आला अन् सोनसाखळी हिसकावून पळाला; झटापटीत महिला जखमी

By अझहर शेख | Published: October 04, 2022 4:35 PM

यावेळी चोरट्याने गळ्यावर हात टाकताच महिलेने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो झटका देऊन पळून गेला.

नाशिक : किराणा दुकानात वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने दुकानातील महिलेकडे नवीन पेनची मागणी केली आणि तो संबंधित महिलेच्या गळ्यातील आठ ग्रॅमची सोनसाखळी ओरबाडून पळाला. ही घटना आडगाव शिवारात घडली. यावेळी चोरट्याने गळ्यावर हात टाकताच महिलेने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो झटका देऊन पळून गेला.

मिळालेल्या माहितीनुसार, शरयू पार्क परिसरात असलेल्या ओमकार बंगल्यात एक छोटेसे किराणा दुकान आहे. सोमवारी (दि. ३) रात्री आठ वाजताच्या सुमारास मीनाक्षी दिनकर ठाणगे या नेहमीप्रमाणेच दुकानात बसलेल्या होत्या. यावेळी एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एका संशयिताने दुकानात येऊन नवीन पेन मागितली. तेव्हा ठाणगे पेन काढण्यासाठी मागे फिरल्या असता, चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली. यावेळी साखळी अर्धी तुटल्याने त्याने अर्धा भाग सुमारे २० हजार रुपये किमतीचा घेऊन पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी झालेल्या झटापटीत फिर्यादी ठाणगे यादेखील जखमी झाल्या. त्यांच्या गालावर व डोळ्याजवळ दुखापत झाली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वार चोरांविरुद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता दुकानदार महिलाही लक्ष्य -पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्यापाठोपाठ आता चोरांकडून थेट दुकानात येऊन दुकानदार महिलेच्या गळ्यांमधील सोनसाखळी हिसकावण्यापर्यंत मजल वाढल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे सोनसाखळी चोरांनी पोलिसांना याप्रकारे जणू खुले आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसNashikनाशिक