सोशल माध्यमांतून ‘द्वेष’ व्हायरल

By Admin | Updated: February 17, 2017 23:26 IST2017-02-17T23:25:55+5:302017-02-17T23:26:13+5:30

सायबर सेल अनभिज्ञ : वातावरण कलुषित होण्याची भीती

'Hate' viral through social media | सोशल माध्यमांतून ‘द्वेष’ व्हायरल

सोशल माध्यमांतून ‘द्वेष’ व्हायरल

नाशिक : चार महिन्यांपूर्वी राज्यभर विविध मागण्यांसाठी मोर्चे निघाले. याबाबत निर्णय प्रलंबित असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही समाजकंटकांकडून सोशल माध्यमातून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सामाजिक वातावरण कलुषित होण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत सायबर सेल अनभिज्ञ असल्याचे चित्र दिसून येत आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून आरक्षित जागांवर त्या त्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. तथापि, काही असामाजिक तत्त्वांकडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे.
व्हॉट््स अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, टेलिग्राम आदि विविध सोशल माध्यमांच्या आधारे वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न यातून होत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
नजरेतून बाब सुटली...
चार महिन्यांपूर्वी ठिकठिकाणी विविध मोर्चे काढण्यात आले. मोर्चेकऱ्यांच्या मागण्या शासन व्यवस्थेशी संबंधित असल्या तरी त्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. अशातच मतदानप्रक्रिया तोंडावर आली असताना सोशल माध्यमातून फिरत असलेल्या विविध संदेशातून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित होत आहेत. त्यामुळे सामजिक तेढ वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांचा सायबर सेल या गोष्टींवर लक्ष ठेवून असल्याचा दावा केला जात असला तरी, त्यांच्या नजरेतून ही बाब सुटल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: 'Hate' viral through social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.