गारपीट होऊनही पावणे पाच हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात कृषी समिती
By Admin | Updated: February 13, 2015 01:17 IST2015-02-13T01:16:54+5:302015-02-13T01:17:20+5:30
गारपीट होऊनही पावणे पाच हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात कृषी समिती

गारपीट होऊनही पावणे पाच हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात कृषी समिती
बैठक : नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश नाशिक : जिल्'ात नोव्हेंबरपासून कालपरवापर्यंत गारपिटीमुळे व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याच्या दृष्टीने कारवाई करावी, असे आदेश कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी कृषी विभागाला दिले. मागील तहकूब व नियमित सभा केदा अहेर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. टंचाईग्रस्तांना लाभ देताना अल्पभूधारकांप्रमाणेच बहुभूधारकांनाही लाभ देण्यात यावा, अशी सूचना सदस्यांनी केली. तसेच ११ फेब्रुवारी २०१५ रोजी झालेल्या गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे तत्काळ करण्यात यावे, असे आदेश केदा अहेर यांनी दिले. बैठकीत हस्ते (सुरगाणा), येथील ६ जळीत प्रस्तावास व वाईबोथी (येवला) येथील जळीत प्रस्तावांना मंजुरी देण्याचा ठराव संमत करण्यात आला. बैठकीत कृषी अधिकाऱ्यांनी जिल्'ातील टंचाईग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३०१ कोटी ६७ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, ते शेतकऱ्यांच्या खात्यावर आॅनलाइन पद्धतीने जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.