हरसूल नामको बँकेत धाडसी चोरीचा प्रयत्न
By Admin | Updated: September 2, 2014 01:14 IST2014-09-01T22:07:46+5:302014-09-02T01:14:26+5:30
हरसूल नामको बँकेत धाडसी चोरीचा प्रयत्न

हरसूल नामको बँकेत धाडसी चोरीचा प्रयत्न
हरसूल : येथील बाजारपेठेतील चार दुकाने फोडल्याची घटना ताजी असताना चोरांनी थेट ‘नामको’ बँकेच्या हरसूल शाखेतील अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असताना सुद्धा पाठीमागील खिडकी तोडून मुख्य तिजोरी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
त्यामुळे हरसूल येथील बाजारपेठेत चोरीची दहशत कायम राहिली, तर सायंकाळी मुख्य बाजारपेठेत हरसूल पोलिसांनी सशस्त्र दलासह संचलन केल्यानंतर अवस्था काही तासात रात्री नाशिक मर्चंट को-आॅप. बँक फोडून चोरट्यांनी हरसूल पोलिसांसमोर आव्हान कायम ठेवले आहे.
आज सकाळी नामको बँकेच्या येथील शाखेचे व्यवस्थापक टी. के. सूर्यवंशी यांनी बँक उघडल्यानंतर पाठीमागील खिडकी तुटली असल्याचे लक्षात येताच पोलिसांना खबर दिल्याने पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी करत श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण केले.
त्यानुसार फिंगर प्रिंट घेऊन हरसूल पोलिसांनी संशयितांची धरपकड, सुरूकेली, तर श्वानाला बँकेच्या बाहेर माग काढता आले नाही, अशी माहिती पोलीस उप अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली आहे, तर चोरट्यांनी बँकेत यशस्वी प्रवेश करत बॅटरी रुममधील सर्व कनेक्शन बंद करून तिजोरी खोलण्याचा अयशस्वी प्रयत्न केला असल्याची माहिती व्यवस्थापक टी. के. सूर्यवंशी यांनी दिली. चोरट्यांनी अलार्म वायर व सीसीटीव्हीच्या वायरी तोडल्यानंतर तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला व बँक कर्मचारी बँक बंद झाल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद करतात घटना झाली तेव्हा कॅमेरे बंद होते, तरीसुद्धा चोरट्यांनी अलार्म व सीसीटीव्हीच्या वायरी तोडल्या त्यामुळे चोर हे भुरटे आहे की माहितगार आहे याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. या घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक मोक्षदा पाटील, हरसूल मधे तळ ठोकून आहे, तर रावसाहेब कीर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल पोलीसचे पथकाने ठिकाणी धाडसत्र चालू केले आहे. (वार्ताहर)