हर्षवर्धन सदगीर यांचा पिंपळे येथे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:11 IST2020-02-07T21:42:19+5:302020-02-08T00:11:02+5:30

पिंपळे येथील श्री गोपाल शिक्षण प्रसारक शिक्षण संस्थेच्या श्री गोपाल विद्यालयात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. टी. के. सदगीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

Harshavardhan Sadgir was honored at Pimple | हर्षवर्धन सदगीर यांचा पिंपळे येथे सत्कार

हर्षवर्धन सदगीर यांचा पिंपळे येथे सत्कार


पिंपळे येथील गोपाल विद्यालयात महाराष्टÑ केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा सत्कार करताना डॉ. टी. के. सदगीर, मारुती बिन्नर, तुकाराम सदगीर, बाळासाहेब सदगीर यांच्यासह ग्रामस्थ.

सिन्नर : तालुक्यातील पिंपळे येथील श्री गोपाल शिक्षण प्रसारक शिक्षण संस्थेच्या श्री गोपाल विद्यालयात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. टी. के. सदगीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे लेजीम पथक, झांज पथक यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते उदय सांगळे, मारुती बिन्नर, रमेश कुकडे, विशाल बलकवडे, रोहित अहिरे, बाळासाहेब बिन्नर, धर्मा शिंदे, भाऊसाहेब सदगीर, कोंडाजी ढोन्नर, बाळासाहेब सदगीर, डॉ. राजेंद्र बिन्नर, संपत बिन्नर, दीपक चव्हाण, पोलीसपाटील डॉ. सागर सदगीर, सुभाष घुगे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक तुकाराम सदगीर यांनी केले. महाराष्ट्र केसरी पहिलवान हर्षवर्धन सदगीर यांचा सत्कार करण्यात आला. पिंपळे व परिसरातून ५१ हजार रुपयांचा मदत निधी जमा करून देण्यात आला.

Web Title: Harshavardhan Sadgir was honored at Pimple