हर्षवर्धन सदगीरचा साकूर येथे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:11 IST2020-01-16T21:36:44+5:302020-01-17T01:11:46+5:30

महाराष्ट्र केसरी किताब मिळविल्यानंतर हर्षवर्धन सदगीरचा साकूर येथे सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र केसरीची गदा पटकावल्यानंतर भगूर येथील बलकवडे व्यायामशाळेचा पहिलवान हर्षवर्धन सदगीर यांचे मंगळवारी साकूरला आगमन होताच स्वागत करण्यात आले.

Harshavardhan Sadgir felicitated at Sakur | हर्षवर्धन सदगीरचा साकूर येथे सत्कार

साकूर येथे महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारे हर्षवर्धन सदगीर यांचा साकूर ग्रामपंचायतीच्या वतीने नागरी सत्कार करताना संदीप गुळवे, ज्ञानेश्वर लहाने व इतर पदाधिकारी व ग्रामस्थ.

ठळक मुद्देमहाराष्ट्र केसरी : साकूर गावातून ठिकठिकाणी औक्षण करून सजवलेल्या रथातून मिरवणूक

नांदूरवैद्य : महाराष्ट्र केसरी किताब मिळविल्यानंतर हर्षवर्धन सदगीरचा साकूर येथे सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र केसरीची गदा पटकावल्यानंतर भगूर येथील बलकवडे व्यायामशाळेचा पहिलवान हर्षवर्धन सदगीर यांचे मंगळवारी साकूरला आगमन होताच स्वागत करण्यात आले.
फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी, तसेच ठिकठिकाणी औक्षण करून सजवलेल्या रथातून संपूर्ण साकूर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी व्यासपीठावर संदीप गुळवे, वामन खोसकर, संपत सकाळे, नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोरख बोडके, ज्ञानेश्वर लहाने, दत्तू सहाणे, भास्कर गुंजाळ, सोमनाथ जोशी, विशाल बलकवडे, गोरख बलकवडे, इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव सहाणे, कचरू कडभाने, इगतपुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, उत्तम भोसले, सागर बर्डे, वस्ताद काका पवार आणि कांस्यपदक विजेते रमेश कुकडे, यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केसरीच्या विविध गटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सागर बर्डे व कांस्यपदक पटकावणारे साकूर गावचे पहिलवान रमेश कुकडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी साकूर येथील सरपंच विनोद आवारी, उपसरपंच दिनकर सहाणे, चेअरमन मधुकर सहाणे, मा चेअरमन जगनराव सहाणे, बाळासाहेब शेळके, शिवाजी सहाणे, सुनील सहाणे, समाधान सहाणे, खंडेराव रायकर, संजय पावसे, शंकर सहाणे, चंद्रकांत सोनवणे, सुरेश पावसे, भारत सहाणे, संजय सहाणे, रुंजा सगर, रामचंद्र सहाणे, आकाश सहाणे, सागर भोर, ग्रामपंचायत सदस्य बहिरू सहाणे, तुकाराम सहाणे, अनिल उन्हवणे, विष्णू सहाणे, ज्ञानेश्वर सहाणे, संतोष पावसे, रामकिसन कुकडे, शांताराम आवारी, दत्ता आवारी, भारत आवारी आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Harshavardhan Sadgir felicitated at Sakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.