येवला मर्चंट को-आॅप बँकेच्या चेअरमनपदी हर्षाबेन पटेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 15:51 IST2018-10-16T15:51:23+5:302018-10-16T15:51:34+5:30
येवला : येवला मर्चंट को-आॅप बँकेच्या चेअरमनपदी हर्षाबेन पटेल यांची निवड झाली. सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन पदाच्या निवडीसाठी सभा संपन्न झाली.

येवला मर्चंट को-आॅप बँकेच्या चेअरमनपदी हर्षाबेन पटेल
येवला :
येवला मर्चंट को-आॅप बँकेच्या चेअरमनपदी हर्षाबेन पटेल यांची निवड झाली. सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन पदाच्या निवडीसाठी सभा संपन्न झाली.
दि.५एप्रिल २०१५ रोजी झालेल्या येमकोच्या पंचवार्षिक निवडणुकीत जनसेवा पॅनलला १३ तर परिवर्तन पॅनलला दोन जागावर विजय मिळाल होता.
येमकोवर निर्वीवाद जनसेवा पॅनलची सत्ता आल्याने बँकेचे जेष्ठ संचालक पंकज पारख यांना२०ए प्रिल २०१५ रोजी चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती या चेअरमन निवडीच्या सभेत हर्षाबेन परेश पटेल व पद्मावती सुनील शिंदे यांनी चेअरमनपदासाठी निर्धारित वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केले.यावेळी झालेल्या गुप्त मतदानात हर्षाबेन पटेल यांना ७ तर पद्मावती शिंदे यांना६ मते मिळाली.हर्षाबेन पटेल यांची चेअरमनपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ पाटील यांनी लोकमतला दिली.
सभेसाठी मावळते चेअरमन पंकज पारख,धनंजय कुलकर्णी,विजय चंडालिया, मनोज दिवटे,अरु ण काळे,विजया परदेशी,राजेश भांडगे,सुशील गुजराथी ,मनिष काबरा, बंडू क्षीरसागर,सुधीर गुजराथी, हे संचालक उपस्थित होते.