हळद समारंभात नाचू न दिल्याने वार
By Admin | Updated: July 23, 2014 00:30 IST2014-07-23T00:10:19+5:302014-07-23T00:30:51+5:30
हळद समारंभात नाचू न दिल्याने वार

हळद समारंभात नाचू न दिल्याने वार
नाशिक : मित्राच्या हळदीची वेळ संपल्यानंतरही गाणी लावून नाचू न देण्याच्या कारणावरून एकावर चाकूने वार केल्याची घटना सातपूरमधील शिवाजीनगरमध्ये घडली़
याप्रकरणी आकाश पवार या संशयिताला अटक करण्यात आली आहे़ गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किशोर खैरनार याच्या हळदीच्या कार्यक्रमात गाणी लावून नितीन कानडी व आकाश पवार हे दोघे नाचत होते़ समारंभ झाल्यावर मद्यप्राशन केलेल्या पवार याने पुन्हा गाणी सुरू करण्यासाठी शिवीगाळ सुरू केली़ त्याला समजावण्यास गेलेल्या कानडी व अहेर या दोघांवरही पवारने चाकूने वार केले आहे़ (प्रतिनिधी)