कोनांबे धरणाचे जलपूजन
By Admin | Updated: July 24, 2016 21:42 IST2016-07-24T21:38:28+5:302016-07-24T21:42:30+5:30
कोनांबे धरणाचे जलपूजन

कोनांबे धरणाचे जलपूजन
सिन्नर : गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कोनांबे धरण भरले आहे. या धरणातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सुदर्शन ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांच्या हस्ते धरणाचे जलपूजन करण्यात आले.
त्यानंतर परसराम बाबा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कोनांबेकरांच्या वतीने महाराष्ट्र राज्य कृषी सेलचे अध्यक्ष निवृत्ती डावरे यांच्या हस्ते चव्हाणके यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सुदर्शन ट्रस्टच्या वतीने धरणातील गाळ काढल्यामुळे जलसाठ्यात वाढ होऊन परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कमी झाल्याचे अशोक डावरे यांनी सांगितले.
यावेळी डॉ. आर. व्ही. गोऱ्हे, निवृत्ती डावरे, भाऊपाटील डावरे, दत्तात्रय डावरे, माजी सरपंच मोहन डावरे, पोलीसपाटील पांडुरंग डावरे, सोनांबेच्या सरपंच पुष्पा पवार, माजी सरपंच रामनाथ डावरे, एम. डी. पवार, अर्चना ढोली, संजय जाधव, विजय उगले, संजय चव्हाणके, भाऊसाहेब शिंदे, रंजना भागवत, प्रकाश डावरे, राजेंद्र लहामगे, बापू गवारे, छाया मुंढे, बाळासाहेब डावरे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच संजय डावरे यांनी आभार मानले. (वार्ताहर)