हरणबारी धरण ओव्हरफ्लो

By Admin | Updated: September 21, 2015 22:44 IST2015-09-21T22:42:15+5:302015-09-21T22:44:07+5:30

बागलाण : केळझर भरले ९५ टक्के ; मोसम नदीला पूर

Harnabari dam overflow | हरणबारी धरण ओव्हरफ्लो

हरणबारी धरण ओव्हरफ्लो

सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसापासून पाऊस सुरु च आहे. त्यामुळे धरण साठ्यात झपाट्याने वाढ होऊन सोमवारी मध्यरात्री हरणबारी धरणाबरोबरच दसाना लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने मोसम आणि हत्ती नदीला पूर आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे .
बागलाण तालुक्यातील सुमारे ११६६ दशलक्ष घनफुट क्षमता असलेले हरणबारी हे सर्वात मोठे धरण आहे. या धरणावर बागलाण तालुक्यासह मालेगाव तालुक्यातील १२० गावांचा सिंचन आण िपाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत .यंदा मात्र पावसाने तब्बल दीड मिहना दडी मारल्यामुळे तालुक्यापुढे मोठे जलसंकट उभे ठाकले होते.
गेल्या चार दिवसांपासून धरण क्षेत्रासह तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने सोमवारी मध्यरात्री हरणबारी धरण तुडुंब भरून सांडव्यामधून सुमारे साडेपाचशे क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग आहे.त्यामुळे नदीला पूर आला आहे. या पाण्यामुळे नदी काठच्या पाणीपुरवठा योजना पूर्ववत होऊन टंचाई दूर होण्यास मदत होणारआहे. दरम्यान ६९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेला दसाना व ५९ दशलक्षघफुट साठवण क्षमता असलेला पठावा लघु प्रकल्पही ओसंडून वाहू लागल्याने हत्ती व कान्हेरी नदीला पूर आल्याने आरम नदीलाही पाणी आले गेले आहे. यामुळे सटाणा शहरासह मुंजवाड, केरसाने, वटार, विंचुरे, जोरण, किकवारी, तळवाडे दिगर,मोरकुरे, विरगाव, डोगरेज ,तरसाळी, वनोली, औंदाणे, केरसाने, या टंचाईग्रस्त गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे .दरम्यान सुमारे ५७२ दशलक्षघनफुट क्षमता असलेला केळझर मध्यम प्रकल्प ९५ टक्के भरला आहे. प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाची रीरीप सुरूच असल्यामुळे रात्रीतून हा प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे . ( वार्ताहर)

Web Title: Harnabari dam overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.