हिरावाडीरोडला जुगार अड्ड्यावर छापा : २३ जुगारी ताब्यात
By Admin | Updated: June 9, 2017 18:29 IST2017-06-09T18:29:58+5:302017-06-09T18:29:58+5:30
७८ हजारांचा मुद्देमाल जप्त : पोलिसांची कारवाई

हिरावाडीरोडला जुगार अड्ड्यावर छापा : २३ जुगारी ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : हिरावाडीरोडवरील क्षीरसागर कॉलनीतील एका बंगल्याच्या आवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी (दि. ८) रात्रीच्या सुमाराला छापा टाकून जुगार अड्ड्याच्या मालकासह तब्बल २३ जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३६ हजारांची रोकड व जुगाराचे साहित्य असा जवळपास ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी हा छापा टाकला.
पोलिसांनी जुगार अड्डा चालविणाऱ्या बाळासाहेब पाटील यांच्यासह तब्बल २३ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात जुगार कायदा प्रतिबंधात्मक अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.