नांदगाव सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हिरे
By Admin | Updated: January 12, 2016 23:03 IST2016-01-12T23:02:36+5:302016-01-12T23:03:10+5:30
नांदगाव सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हिरे

नांदगाव सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हिरे
नांदगाव : येथील नांदगाव तालुका माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेश हिरे यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या संचालक मंडळाच्या झालेल्या विशेष सभेत हिरे यांच्या
निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात
आले.
गेल्या महिन्यातच पतसंस्थेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवडणूक पार पडली. त्यानंतर येवल्याचे सहकार अधिकारी आर. एस. वर्दे यांच्या उपस्थितीत चेअरमन, व्हाइस चेअरमन पदासाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात आली होती. त्यात ही निवड झाली. अध्यक्षपदी टाकळी बुद्रुक येथील आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राजेश हिरे यांची, उपाध्यक्षपदी येथील माध्यमिक विद्यालयाचे साहेबराव काळे यांची, तर कार्यवाहपदी साकोरा येथील पेडकाई माध्यमिक विद्यालयाचे विजयकुमार बोरसे यांची निवड करण्यात आली.
नव्या पदाधिकारी निवडीनंतर पतसंस्थेचे संस्थापक पी. आर. पाटील यांच्या हस्ते बिनविरोध निवडून आलेल्या व नव्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी योगेश पाटील, प्रकाश सोनजे, संदीप पगार, पंजाबराव अहेर, राजाराम देवरे, काशीनाथ पवळे, देवीदास शेवरे, ज्ञानेश्वर पाटील, सुनीता निकम, कल्पना पारखे आदि उपस्थित होते. संस्थेचे सचिव संतोष गांगुर्डे यांनी निवडणूक प्रक्रियेत सहायक म्हणून काम पाहिले. (वार्ताहर)