हरहर महादेवचा जयघोष...
By Admin | Updated: February 25, 2017 23:45 IST2017-02-25T23:45:13+5:302017-02-25T23:45:30+5:30
कपालेश्वर मंदिरात लघुरुद्र अभिषेक : वीरशैव लिंगायत समाजातर्फे धार्मिक कार्यक्रम

हरहर महादेवचा जयघोष...
नाशिक : येथील कपालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने लघुरुद्र अभिषेक करण्यात आला. यावेळी वीरशैव लिंगायत समाजाचे व श्रीशैल्य ज्योतिर्लिंग पीठाचे उपमठ असलेले बंहुनीमठ श्रीक्षेत्र वडांगळीश्वर मठाचे मठपती महामंडलेश्वर पंडिताराध्य शिवाचार्य वडांगळीकर महाराज उपस्थित होते. सकाळी ६.१५ ते ७.०० या दरम्यान वडांगळीकर महाराजांसहित मंदिराचे मुख्य पुजारी अतुल शेवाळे, अविनाश गाडे, पुरोहित जंगम, सतीशस्वामी जंगम, रमेशस्वामी हिरेमठ, प्रभाकरस्वामी तोडकर, प्रशांतस्वामी जंगम, लक्ष्मेश्वरस्वामी जंगम यांनी मंत्रघोषात शिवलिंगावर लघुरुद्र अभिषेक केला. याप्रसंगी अनिल कोठुळे, सुनील वाडकर, राजेंद्र लोहाकर, गणेश भोर आदिंसह शिवभक्त व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंचवटी परिसरातील मनकामेश्वर महादेव मंदिरात अभिषेक करण्यात आला. तसेच मंदिरातून महादेवाचे पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती. सदर मिरवणूक पंचवटी, जुना आडगाव नाका, औरंगाबादरोड मार्गे मंदिरात आली. यावेळी भाविक उपस्थित होते.