शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

कोरोना संसर्गाने हिरावला विद्यार्थ्यांचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:24 IST

वेळुंजे/त्र्यंबकेश्वर : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सुप्त वाव देत आहेत. एकीकडे शिक्षकांनी डिजिटलसारख्या शिक्षणप्रणाली माध्यमातून शिक्षणावर भर दिल्याने विद्यार्थ्यांच्या ‘डिजिटल’ शिक्षणाविषयी उत्साह वाढीस लागला आहे. मात्र यावर्र्षी कोरोनाने डिजिटल शाळांतील विद्यार्थ्यांचा आनंद हिरावून घेतला असल्याने शिक्षकांच्या संकल्पनेतील डिजिटल शाळेच्या भिंती विद्यार्थ्यांवाचून सुन्यासुन्या पडल्या आहेत.

ठळक मुद्दे भिंती सुन्या सुन्या : शिक्षकांच्या संकल्पनेतील ‘कसबेपाडा एक्स्प्रेस’ विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत

सुनील बोडके ।लोकमत न्यूज नेटवर्कवेळुंजे/त्र्यंबकेश्वर : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सुप्त वाव देत आहेत. एकीकडे शिक्षकांनी डिजिटलसारख्या शिक्षणप्रणाली माध्यमातून शिक्षणावर भर दिल्याने विद्यार्थ्यांच्या ‘डिजिटल’ शिक्षणाविषयी उत्साह वाढीस लागला आहे. मात्र यावर्र्षी कोरोनाने डिजिटल शाळांतील विद्यार्थ्यांचा आनंद हिरावून घेतला असल्याने शिक्षकांच्या संकल्पनेतील डिजिटल शाळेच्या भिंती विद्यार्थ्यांवाचून सुन्यासुन्या पडल्या आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे वाघेरा (ता. त्र्यंबकेश्वर) येथील ‘कसबेपाडा एक्स्प्रेस’ होय.तालुक्यात दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळेत डिजिटल क्लासरूम निर्मित होत आहेत. तालुक्यातील अतिदुर्गम आणि जवळपास महाराष्टÑ - गुजरात राज्यांच्या सीमावर्ती भागातील काथवडपाडा येथे जिल्हा परिषदेची शाळा शिक्षकांच्या संकल्पनेत प्रथम तालुक्यात डिजिटलवर्ग म्हणून उदयास आली आहे. त्यानंतर अनेक जिल्हा परिषद शाळा डिजिटल क्लासच्या माध्यमाकडे वळल्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यात शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या सामाजिक उपक्रमाच्या सहकार्याने शाळा डिजिटल रूपात झाल्या आहेत. यात अनेक शाळांच्या आतून - बाहेरून शिक्षकांनी कल्पनेतून भिंती बोलक्या केल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. वाघेरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ‘कसबेपाडा’ येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीवर कलाशिक्षक संदीप गांगुर्डे यांनी बसचा आकार दिल्याने तालुक्यात ‘कसबे एक्स्प्रेस’ चर्चत आहे. तसेच या शाळेला अनेक शिक्षक भेट ही देत आहेत. कोरोनाने मोठ्या प्रमाणावर फैलाव केल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या संचारबंदी, लॉकडाऊनचा फटका या डिजिटल शाळांनाही बसला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत असलेली ‘कसबे एक्स्प्रेस’ ज्ञानार्जनाच्या प्रतीक्षेत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभाग आॅनलाइन शिक्षणप्रणालीचा अवलंब करीत आहे तर कुठे शिक्षकवर्ग विद्यार्थ्यांसाठी आॅफलाइन शिक्षणावर भर देत आहे. तालुक्यात काही भागात नेटवर्क नसल्याने आॅनलाइन शिक्षणाचा अभाव दिसून येत असल्याने पर्यायी व्यवस्थेसाठी शिक्षक कार्यरत आहेतच; परंतु शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी सहकार्याच्या कल्पनेतून सजवलेल्या भिंती मात्र विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत आहेत.लॉकडाऊनचा फटकाकोरोना विषाणू संसर्गाने मात्र देशभर तसेच राज्यातही मोठ्या प्रमाणावर फैलाव केल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या संचारबंदी, लॉकडाऊनचाफटका या डिजिटल शाळांनाही बसला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत असलेली ‘कसबेएक्स्प्रेस’ ज्ञानार्जनाच्या प्रतीक्षेत आहे.वाघेरा येथील कसबेपाडा शाळेच्या भिंती सामाजिक उपक्रमातून बोलक्या करण्यात आल्या आहेत. शाळेच्या भिंतीवर रेखाटलेले बसचे चित्र लक्ष्य वेधून घेत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे.- संदीप गांगुर्डे, कलाशिक्षक

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या