शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

कमी दरामुळे कांद्याची आठवडे बाजारात होते आहे हातविक्र ी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 19:20 IST

मानोरी : मागील दीड महिन्यापासून येवला तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम भागात शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहे. आजच्या परिस्थितीत शेतकरी सर्वच बाजूने त्रस्त झालेला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच शेतमालाला योग्य प्रमाणात भाव मिळत नसल्याने आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात मंदावली आहे.

ठळक मुद्देमजूर वर्गाला देखील काम मिळवणे आवाक्याबाहेर

मानोरी : मागील दीड महिन्यापासून येवला तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम भागात शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहे. आजच्या परिस्थितीत शेतकरी सर्वच बाजूने त्रस्त झालेला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच शेतमालाला योग्य प्रमाणात भाव मिळत नसल्याने आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. वर्षभर शेतातील काळ्यामातीत घाम गाळून रब्बी आणि खरीप हंगामातील पिकांची मेहनत घेत असतात. काळी मातीच शेतकºयांच खर सोन असून या काळ्या मातीतच यंदा मेहनतीसाठी पाऊस आणि जमिनीत पाणी नसल्याने मेहनतीऐवजी आपल्याच शेतात काम नसल्याने दुसºयांच्या शेतात काम करण्याची वेळ शेतकºयांवर आली असून मजूर वर्गाला देखील काम मिळवणे आवाक्याबाहेर झाले आहे.सध्या स्थिती लक्षात घेता मानोरी बुद्रुक आणि खडकीमाळ परिसरात काही शेती हिरवीगार तर निम्म्याहून अधिक शेती पाण्याअभावी ओस पडलेली असून बºयाच शेतकºयांनी आपली शेती नांगरून ठेवलेली बघायला मिळत आहे.येथील एका शेतकºयाने आपल्या दीड एकर शेतात पाण्याअभावी केवळ दीड गुंठाच बागायत केलेली आहे. या दिड गुंठ्यात कांद्याचे बी तयार करण्यासाठी डोंगळे लावल्याचे दिसत आहे. विहिरीत पाणी साठा शिल्लक नसल्याने रब्बीच्या हंगामाला यंदा लगाम लागल्या गत आहे.यंदा भर पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरिपाची ५० टक्के पेक्षा जास्त पिके पाण्याअभावी करपून गेली असल्याने यात उत्पादन खर्च देखील फिटला नसल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे.खरीप हंगामातील केलेल्या कांदा लागवडीला कवडीमोल भाव मिळत आहे. सध्याची परिस्थिती लक्षात कांद्याचे निर्यात मूल्य शून्य असून देखील कांद्याला १०० रु पयांपासून सरासरी २०० ते २५० ते रु पये प्रति क्विंटल दराने भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांचा उत्पादन खर्च भरून निघणे देखील कठीण झाले आहे.सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणीत शेतकरी सापडला आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात मार्च महिन्यात साठवून ठेवलेल्या कांद्याच्या चाळी आजही जशात तशा भरलेल्या असून कांदा सडायला देखील सुरु वात झाली आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमी भावाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार कधी ? अशी अपेक्षा शेतकºयांना लागली आहे. येवला तालुक्यातील शेतकºयांनी विक्र ीसाठी नेलेला कांदा कवडीमोल भावात खरेदी केल्याने कांदा रस्त्यावर ओतून आपला रोष व्यक्त केला होता. तसेच कांद्याची दरवाढ व्हावी, कांद्याला हमी भाव मिळावा यासाठी नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चा, महामार्गावर रास्ता रोको करून देखील सरकार अस्वस्थ का बसलं आहे ? असा सवाल शेतकरी करत आहेत. मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड, शिरसगाव, सत्यगाव, पिंपळगाव लेप आदी परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी आणि परिवहन महामंडळाकडून मोफत बस पास उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.मानोरी बुद्रुक येथील बहुतांश शेतकºयांनी सत्यगाव येथून गेलेल्या नांदूरमध्यमेश्वर कॅनॉल परिसरातून पाईपलाईनद्वारे सुमारे १० किलोमीटर अंतर पारकरून मानोरी परिसरात शेतीसाठी पाणी आणल्याने रब्बी हंगामातील पिकांना या पाण्याचा फायदा होणार आहे. तर निम्म्याहून अधिक शेतकरी हे पाऊस आणि पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून असल्याने सध्या पालखेड डावा कालव्यातून येवला तालुक्यात पिण्याचे पाणी आणि शेती सिंचनासाठी आवर्तन असून वितरिका नंबर २१ आणि २५ पाणी येणार कधी ? अशी अपेक्षा शेतकºयांना लागली असून पालखेड आवर्तनाच्या भरवशावर शेतकºयांचं पुढील पाच ते सात महिन्यांचं भवितव्य अवलंबून आहे. रब्बी हंगामातील हरभरा पिकाला मानोरी बुद्रुकच्या शेतकºयांनी पसंती दिली असून या पिकाला कमी प्रमाणात पाणी लागत असल्याने हरबरा पिकातून उत्पादन नाही निघाले तरी चालेल पण जनावरांचा चारा तर मिळेल या आशेने शेतकरी हरभरा पिकांची लागवड करत आहेत. त्यात पालखेड आवर्तनातून तात्काळ पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करत आहेत.शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च फिटणे देखील अवघड झाले आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने आठवडे बाजारात कांदा हात विक्र ी करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. त्यामुळे शासनाने कांद्याला २००० रु पये कांद्याला तरी भाव देऊन शेतकºयांना दिलासा द्यावा.- राजेंद्र उत्तम शेळके,शेतकरी.