हनुमाननगरला ९० हजाराची घरफोडी
By Admin | Updated: May 11, 2014 20:06 IST2014-05-11T18:03:28+5:302014-05-11T20:06:31+5:30
आडगाव पोलीस ठाणे : सोन्याचांदीचे दागिने लंपास

हनुमाननगरला ९० हजाराची घरफोडी
आडगाव पोलीस ठाणे : सोन्याचांदीचे दागिने लंपास
पंचवटी : आडगाव शिवारातील हनुमाननगर येथे असलेल्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरटयांनी कपाटातील सोन्याचांदीचे दागिने असा ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत सुनंदा गंगाधर तरवटे या महिलेने आडगाव पोलीसात घरफोडी झाल्याची तक्रार नोंदविली आहे.
गेल्या बुधवारी तरवटे हया न्युरोकअर हॉस्टीटलमध्ये पतीवर उपचार करण्यासाठी मुलासमवेत गेल्या होत्या तेथून घराकडे परतल्यानंतर घराचा दरवाजा उघडा दिसला तसेच कपाटातील तिजोरीत ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने जागेवर दिसुन आले नाही. घरात कोणीतरी घुसून घरफोडी केल्याचे लक्षात येताच तरवटे यांनी आडगाव पोलीसात धाव घेऊन घरफोडी झाल्याची तक्रार नोंदविली आहे. चोरटयांनी तरवटे यांच्या घरातून सोन्याची पोत तसेच अंगठया असे जवळपास सहा ते सात तोळयाचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक जे. ए. नाईक तपास करीत आहेत. (वार्ताहर)