लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्यातील वडगाव-पिंगळा येथील दोन दिवसीय हनुमान यात्रोत्सवाची उत्साहात सांगता झाली. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी येथे हनुमान यात्रोत्सव साजरा केला जातो. गुरुवारी सकाळी मंदिर परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी बैलगाडीच्या सजविलेल्या रथातून हनुमानच्या चांदीच्या मुखवट्याची मिरवणूक काढण्यात आली. रथ मिरवणुकीत आबालवृद्धांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गावातील प्रत्येक घरासमोर सुवासणींनी रथ व मुखवट्याचे पूजन केले. सुमारे तीन तास चाललेल्या मिरवणुकीत मारुती मंदिराच्या प्रांगणात सांगता झाली. यात्रोत्सवानिमित्त मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेसाठी व्यवसाय व नोकरधंद्यासाठी परगावी गेलेले ग्रामस्थ गावी आले होते. यात्रेनिमित्त परिसरात खेळणी व खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली होती.यावेळी सरपंच ललिता हरळे, उपसरपंच सुरेश नागरे, पोलीसपाटील सागर मुठाळ, ज्ञानेश्वर हारळे, अजय हुळहुळे, रामभाऊ भवर, नाना सानप, रामभाऊ मुठाळ, गेणूजी सानप, खंडेराव विंचू, सुरेश सानप, प्रदीप शिंदे, योगेश शिंदे, प्रल्हाद मुठाळ, धीरज मुठाळ, रामकिसन विंचू, भगवान सानप, अमोल सानप उपस्थित होते. यात्रेनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
वडगावपिंगळा येथे हनुमान यात्रा उत्साहात
By admin | Updated: May 6, 2017 22:51 IST