‘आम्हाला फाशी द्या’ आपचे सेनेविरोधात अभिनव आंदोलन
By Admin | Updated: October 31, 2015 23:27 IST2015-10-31T23:25:54+5:302015-10-31T23:27:37+5:30
‘आम्हाला फाशी द्या’ आपचे सेनेविरोधात अभिनव आंदोलन

‘आम्हाला फाशी द्या’ आपचे सेनेविरोधात अभिनव आंदोलन
नाशिक : ‘आम्ही आरटीआय कार्यकर्ते आहोत, आम्हाला फाशी द्या’ असे गळ्यात फलक लटकावून आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गळ्यात फाशीचा दोर अटकावून आंदोलन केले.
लातूर येथील डॉ. शाहू महाविद्यालयाच्या कामकाजाची माहिती माहिती अधिकार कायद्यान्वये मागितल्याचा राग येऊन शुक्रवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मल्लीकार्जुन भाईकट्टी या माहिती अधिकार कायकर्त्याला बेदम मारहाण करून तोंडाला काळे फासले होते. त्याच्या निषेधार्थ व मारहाण करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून आम आदमी पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘फाशी’ आंदोलन केले. या आंदोलनात जितेंद्र भावे, स्वप्नील घिया, जगवीर सिंग, एकनाथ साबळे, योगेश कापसे, सचिन शिणगारे, अक्षय अहिरे, राजू आचार्य, विनायक येवले, रमेश मराठे आदि सहभागी झाले होते.