विद्यार्थिनींनी बनविलेल्या राख्या सैनिकांना सुपूर्द
By Admin | Updated: August 14, 2016 23:11 IST2016-08-14T23:09:56+5:302016-08-14T23:11:47+5:30
विद्यार्थिनींनी बनविलेल्या राख्या सैनिकांना सुपूर्द

विद्यार्थिनींनी बनविलेल्या राख्या सैनिकांना सुपूर्द
देवळाली कॅम्प : शेवगेदारणा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी लष्करी जवानांकरिता बनविलेल्या विविध राख्या लष्करी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या.
यानिमित्त शाळेत आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नायक सुभेदार बी. एस. भंडारी, नायक सुग्रीप सिंग, मुख्याध्यापक लक्ष्मण लिल्लके, सरपंच सविता ढोकणे, गजानन पाळदे, दीपक कासार आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनींनी उपस्थित लष्करी अधिकारी व जवानांचे औक्षण करत त्यांना राख्या बांधल्या. तसेच सीमेवर रक्षणासाठी तैनात असलेल्या लष्करी जवानांसाठी बनविलेल्या राख्यांचा बॉक्स विद्यार्थिनींनी लष्करी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. नायक सुभेदार बी. एस. भंडारी यांनी विद्यार्थिनींनी बनविलेल्या राख्या लष्करी जवानांपर्यंत पोचविण्यात येतील असे स्पष्ट केले. सूत्रसंचलन नीता कोष्टी व आभार संदीप पाळदे यांनी मानले. यावेळी चंद्रकांत गोडसे, प्रमोद मोजाड, सुनीता आहिरे, मनीषा गायकवाड, सुनीता पाथरे, विभा जोशी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)