मैत्रिणीच्या घरात केला हात साफ

By Admin | Updated: January 15, 2017 01:17 IST2017-01-15T01:16:58+5:302017-01-15T01:17:11+5:30

गुन्हा दाखल : अडीच लाखांचे दागिने चोरीचा मैत्रिणीवर संशय

Hand in hand in a friend's house | मैत्रिणीच्या घरात केला हात साफ

मैत्रिणीच्या घरात केला हात साफ

इंदिरानगर : मैत्रीचे नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे बोलले जाते. म्हणूनच मैत्रीच्या नात्यात कुठलाही संशय घेतला जात नाही. मात्र, मैत्रीच्या या नात्यात वितुष्ट निर्माण करणारी घटना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. येथील एका मैत्रिणीच्या घरात चक्क तिच्या मैत्रिणीनेच डल्ला मारून सोन्याचे दागिने लंपास के ल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पाथर्डी फाटा परिसरातील प्रशांतनगरमधील आनंदवन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या शुभांगी दीपक निफाडे (२२) यांच्या घरातील दोन लाख ७७ हजार रुपये किमतीचे दागिने चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. शुभांगी यांनी त्यांची मैत्रीण पूजा तांदळे हिच्यावर संशय घेत मैत्रीचा गैरफायदा घेऊन घरामध्ये कोठे काय ठेवलेले आहे, याची माहिती करून घेत सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शुभांगी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयित पूजा तांदळेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Hand in hand in a friend's house