डिसूझा कॉलनीतील अतिक्रमणावर हातोडा

By Admin | Updated: February 6, 2016 00:31 IST2016-02-06T00:12:51+5:302016-02-06T00:31:02+5:30

डिसूझा कॉलनीतील अतिक्रमणावर हातोडा

Hammer on the encroachers at D'Souza Colony | डिसूझा कॉलनीतील अतिक्रमणावर हातोडा

डिसूझा कॉलनीतील अतिक्रमणावर हातोडा

नाशिक : महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयातील अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी कॉलेजरोडवरील डिसूझा कॉलनीतील अयोध्या अपार्टमेंटमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविला. यावेळी पक्के बांधकाम हटविण्याची कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शुक्रवारी आपला मोर्चा डिसूझा कॉलनीकडे वळविला. कॉलनीतील अयोध्या अपार्टमेंटमधील नीलेश रामदास मकर यांनी अनधिकृतपणे बांधलेले १० बाय १० फुटाचे पक्के बांधकाम तसेच ४ बाय ४ फुटाचे शौचालयाचे बांधकाम हटविण्यात आले. पक्के बांधकाम हटविताना पथकातील कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. सदर कारवाई पश्चिमचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Hammer on the encroachers at D'Souza Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.