बाजार समितीतील हमालाचा खून
By Admin | Updated: March 5, 2017 01:57 IST2017-03-05T01:57:30+5:302017-03-05T01:57:42+5:30
पंचवटी : दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालाचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने खून केल्याची घटना शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली़

बाजार समितीतील हमालाचा खून
पंचवटी : दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालाचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने खून केल्याची घटना शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली़ खून झालेल्या इसमाचे नाव दीपक दगडू अहिरे (२९, रा़ निलगिरीबाग, औरंगाबादरोड, असे आहे़ दरम्यान, हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलगिरीबाग येथील दीपक अहिरे हा कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली व्यवसाय करतो़ रात्री अकरा वाजेच्या सुमारास अहिरे आपल्या दुचाकीने (एम एच १५, सीएच ६३७३) जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या पाठीवर वार केले़ यामध्ये अहिरेच्या वर्मी घाव लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला व त्याचा मृत्यू झाला़ (वार्ताहर)