शुल्क वसुलीवरून हमाल-बाजार समितीचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:14 AM2020-01-09T00:14:01+5:302020-01-09T00:14:20+5:30

पंचवटी : कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव झाल्यानंतर व्यापाऱ्यांचा शेतमाल लोखंडी लोटगाडीवरून वाहतूक करणारे हमाल व बाजार समिती व्यवस्थापनात ...

Hamal-Bazar Committee debate on tariff collection | शुल्क वसुलीवरून हमाल-बाजार समितीचा वाद

शुल्क वसुलीवरून हमाल-बाजार समितीचा वाद

Next
ठळक मुद्देपरस्पर विरोधी दावे : पैसे देण्यास हमालांचा विरोध

पंचवटी : कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव झाल्यानंतर व्यापाऱ्यांचा शेतमाल लोखंडी लोटगाडीवरून वाहतूक करणारे हमाल व बाजार समिती व्यवस्थापनात बाजार शुल्क वसुलीवरून वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली असून, हमालांकडून बाजार समितीत वाटेल त्याठिकाणी लोटगाड्या उभ्या केल्या जातात व शेतकऱ्यांनादेखील गाड्या लोटायला लावले जाते. त्यामुळे अनधिकृत हमाली व्यवसाय करणाºयांना शिस्त लागण्यासाठी बाजार समिती प्रत्येक गाडीमागे बाजार शुल्क वसूल करणार असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे तर हमाल शारीरिक कष्ट करून पैसे कमवित असताना त्यात बाजार समितीचा संबंध काय? असा सवाल हमालांनी केला आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन फळ, पालेभाज्या लिलावप्रक्रिया झाल्यानंतर व्यापाºयांचा शेतमाल लोखंडी लोटगाडीवरून गाळ्यावर हमाल वाहून नेतात. अशा हमालांकडून महिन्याकाठी एक हजार रुपये प्रत्येक गाडीमागे शुल्क वसूल करण्याची तयारी बाजार समितीने केली आहे. त्याच्या निषेधार्थ मंगळवारी शेकडो हमालांनी एल्गार पुकारत शेतमाल वाहून नेण्यास नकार दिल्याने लिलाव झाल्यानंतर बाजार समिती आवारात तीन तास शेतमाल पडून होता. काही संचालकांच्या मध्यस्थीने तात्पुरता तोडगा काढून येत्या चार ते पाच दिवसांत हमालांनी निर्णय घ्यावा, असे सुचविण्यात आल्याने हमालांनी बंद मागे घेतला. बाजार समितीत अनेक लोटगाड्या आहेत, परंतु या लोटगाड्यांची बाजार समितीत कोणतीच नोंद नाही. काही हमाल गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्याकडून गुन्हेगारी घटना घडू शकतात. हमालांनी लोटगाड्यांची अधिकृत नोंदणी केल्यास त्या गाड्यांना नंबर देता येतील तसेच संबंधित हमालांचे ओळखपत्र तयार करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड जमा केले जाणार असून, लोटगाड्या रस्त्यात कुठेही उभ्या करून वाहतूक कोंडी होत असल्याने त्यांना शिस्त लावण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक गाडीमागे महिना हजार रुपये शुल्क वसूल करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समिती सचिव अरुण काळे यांनी दिली.

बाजार समितीने जागा दिल्यास तेथे लोटगाड्या उभ्या करू
कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन सकाळ-सायंकाळ सत्रात शेकडो हमाल काम करून उदरनिर्वाह करतात. काही वर्षांपासून हमालांनी शेतमाल कॅरेट वाहून नेण्यासाठी लोखंडी लोटगाड्या तयार केल्या. त्या गाड्यांवर ५० ते ६० कॅरेट हमाल वाहून नेतात त्यामुळे अंतर्गत वाहतूक सोपी जाते, वेळेची बचत होते व लोटगाड्या एकत्र तयार केल्याने सात ते आठ हमालांना त्याचा मोबदला मिळतो. त्यामुळे बाजार समितीला शुल्क का द्यायचे असा सवाल हमालांनी केला असून, बाजार समितीने लोटगाड्या उभ्या करण्यासाठी जागा दिल्यास त्या ठिकाणी गाड्या उभ्या केल्या जातील, असेही हमालांनी म्हटले आहे.

Web Title: Hamal-Bazar Committee debate on tariff collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.