घरपट्टीसाठी झोपडीधारकांचे महापालिकेसमोर धरणे
By Admin | Updated: February 14, 2015 00:20 IST2015-02-14T00:19:43+5:302015-02-14T00:20:01+5:30
घरपट्टीसाठी झोपडीधारकांचे महापालिकेसमोर धरणे

घरपट्टीसाठी झोपडीधारकांचे महापालिकेसमोर धरणे
नाशिक : सन २००० च्या झोपडपट्ट्यांना घरपट्टी लागू करण्यात यावी आणि शहरातील सर्व झोपडपट्ट्या स्लम म्हणून घोषित करण्यात याव्यात, या मागणीसाठी फुले-शाहू-आंबेडकर-कांशीराम बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने झोपडीधारकांनी महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले.
झोपडपट्ट्यांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा पुरवाव्यात, रमाई आवास योजनेचा प्रश्न मार्गी लावावा, पडून असलेल्या ६२५ रमाई आवास योजनेच्या प्रस्तावांचा पहिला हप्ता द्यावा, शहरातील शंभर टक्के झोपड्या स्लम म्हणून घोषित कराव्यात यांसह विविध मागण्यांसाठी महापालिकेसमोर संघटनेचे अध्यक्ष भीमराव जाधव आणि सचिव प्रशांत बार्डे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी झोपडीधारक सहभागी झाले होते.