मुंडे यांचे विमान उतरू देण्यास एचएएलची हरकत

By Admin | Updated: April 30, 2016 00:02 IST2016-04-29T23:00:47+5:302016-04-30T00:02:54+5:30

मुंडे यांचे विमान उतरू देण्यास एचएएलची हरकत

HAL's move to leave Munde's plane | मुंडे यांचे विमान उतरू देण्यास एचएएलची हरकत

मुंडे यांचे विमान उतरू देण्यास एचएएलची हरकत


नाशिक : लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ओझर विमानतळावर खासगी विमानाने येऊ पाहत असलेल्या राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या विमानाच्या लॅण्डिंगला हिंदुस्तान एरोनॉटिक्स अर्थात एचएएलने नकार दिल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.
पंकजा मुंडे या रविवारी (दि. १) गोरज मुहूर्तावर असलेल्या विवाह समारंभासाठी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान बीडहून खासगी विमानाने ओझर विमानतळावर येणार असून, तेथून हेलिकॉप्टरने विवाहस्थळी जातील. त्यानंतर त्यांना तातडीने रात्रीच मध्य प्रदेश येथे एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचे असल्याने रात्री ओझर विमानतळावरूनच ‘टेक आॅफ’ करू दिले जावे यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासन व एचएएलकडे परवानगी मागितली आहे. राजशिष्टाचाराचा भाग म्हणून प्रशासनाकडून ना हरकत दिली गेली असली तरी, एचएएलने नकारात्मक भूमिका घेतली आहे. रविवारी एचएएलला सुटी असल्याने खासगी विमानाची सुरक्षितता, देखभाल करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी लागते व त्यांना कामाचा जादा मोबदला द्यावा लागतो. आर्थिकदृष्ट्या बोझा उचलण्यास एचएएल तयार नसल्यामुळे त्यांनी रविवारी विमानाचे येणे व जाणे या दोन्ही गोष्टींना नकार दिल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. पंकजा मुंडे राज्याच्या कॅबिनेट मंत्री असल्यामुळे त्यांना नकार देता येणार नाही, अशी भूमिका घेत प्रशासनाने एचएएलला राजी करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

Web Title: HAL's move to leave Munde's plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.