शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

नवजात अर्भकांच्या मृत्युदरात निम्म्याने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:42 IST

नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्युदरामुळे गतवर्षी आरोग्य विभागाच्या कार्यशैलीबाबत माध्यमांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते़

नाशिक : नवजात अर्भकांच्या वाढत्या मृत्युदरामुळे गतवर्षी आरोग्य विभागाच्या कार्यशैलीबाबत माध्यमांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते़ यात शासन व आरोग्य विभागाने सुधारणा केल्यामुळे नवजात बालकांच्या मृत्युदरात निम्म्याने घट झाल्याचा दावा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मंगळवारी (दि़१४) केला़ जिल्हा रुग्णालयास अचानक भेट देत नवजात बालकांच्या एसएनसीयू विभागाची पाहणी केली़ आदिवासी भागातील बालमृत्यू रोखण्यासाठी कळवण आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये एसएनसीयू विभाग सुरू करण्यास मंजुरी दिल्याचेही सावंत यांनी सांगितले़  एसएनसीयू विभागात उपचारासाठी दाखल ५५ नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याची घटना गतवर्षी घडली होती़ यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती़ याची दखल घेत आरोग्यमंत्री सावंत यांनी रुग्णालयास भेट देऊन उपाययोजनांची अंमलबजावणीचे आदेश दिले होते़  तसेच जिल्हा रुग्णालयासाठी तातडीने सोयीसुविधाही पुरविण्यात आल्याने १५ टक्के नवजात बालकांचा मृत्यूदर ८़३ टक्क्यांवर आला आहे़ राज्यातील एकमेव माता-नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) नाशिकमध्ये तयार होत असून, यासाठी स्वतंत्र प्रशिक्षित डॉक्टरांसह परिचारिका तसेच तज्ज्ञ न्युआॅनॅटोलॉजिस्टचा कर्मचारीवर्गही मंजूर करण्यात आला आहे़  नवजात अर्भकांवरील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालय व मालेगाव याठिकाणी एसएनसीयू कक्ष असून, या कक्षांप्रमाणेच त्र्यंबकेश्वर व कळवण या ठिकाणीही १२ बेडचा स्वतंत्र एसएनसीयू कक्ष येत्या सहा महिन्यांत सुरू होणार आहे. कुपोषित माता व कुपोषित बालके यांच्यासाठी जिल्ह्णातील सहा तालुक्यांमध्ये मॅम-सॅम युनिट सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर यांचा समावेश आहे़ याबरोबरच माताबालक केंद्र तयार केले जाणार असून, गर्भवती मातांसाठीचा अतिदक्षता विभाग स्वतंत्र असल्याचेही सावंत यांनी सांगितले़  यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ़ सुरेश जगदाळे यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली़ यावेळी डॉ़ पंकज गाजरे, डॉ़ कृष्णा पवार, डॉ़ नरेंद्र बागुल, डॉ़ सुप्रिया गोरे उपस्थित होते़कुपोषणात ३० टक्क्यांनी घटपंचसूत्री उपाययोजना व लोकप्रतिनिधींच्या सहभागामुळे पालघरमधील कुपोषण ३० टक्क्यांनी कमी करण्यात यश आले आहे़ त्यामुळे नाशिक आणि मेळघाट या ठिकाणीही हाच पॅटर्न राबविण्यात येणार आहे़- डॉ़ दीपक सावंत, आरोग्यमंत्री 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य