निम्मे रेशन दुकानदार संपातून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:43 IST2017-08-06T01:43:06+5:302017-08-06T01:43:09+5:30

तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात अन्नधान्य महामंडळ स्थापन करावे व रेशन दुकानदारांना दरमहा ४० हजार रुपये मानधन द्यावे यासह विविध मागण्यांसाठी राज्य रेशन दुकानदार संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपातून नाशिक जिल्ह्णातील निम्मे रेशन दुकानदार बाहेर पडले असून, त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था काही प्रमाणात सुरळीत होण्यास मदत झाली आहे.

Half of the ration shopkeepers exit | निम्मे रेशन दुकानदार संपातून बाहेर

निम्मे रेशन दुकानदार संपातून बाहेर

नाशिक : तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात अन्नधान्य महामंडळ स्थापन करावे व रेशन दुकानदारांना दरमहा ४० हजार रुपये मानधन द्यावे यासह विविध मागण्यांसाठी राज्य रेशन दुकानदार संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपातून नाशिक जिल्ह्णातील निम्मे रेशन दुकानदार बाहेर पडले असून, त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था काही प्रमाणात सुरळीत होण्यास मदत झाली आहे.
विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्णात रेशन दुकानदार संघटनेचे नेतृत्व करणाºया जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे यांच्या नाशिक तालुक्यातील रेशन दुकानदारांनी शनिवारी धान्य उचलण्यासाठी पुरवठा खात्यात चलने भरल्यामुळे या संपाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. राज्यातील रेशन दुकानदारांनी १ आॅगस्टपासून बेमुदत संप पुकारला असला तरी, नाशिक शहरातील सुमारे दोनशेहून अधिक दुकानदारांनी सरकारसोबत सकारात्मक चर्चेतून मार्ग निघण्याची अपेक्षा व्यक्त करून संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जिल्ह्णातील रेशन दुकानदारांनी संप यशस्वी करण्याचा चंग बांधला होता व त्यादृष्टीने गावोगावी बैठका घेऊन वातावरण निर्मिती करण्यात आली होती. त्यानुसार संप सुरू होऊन आता पाच दिवस लोटले असून, सरकारकडून अद्याप त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. रविवार व सोमवारी विधीमंडळ अधिवेशनाला सुटी असल्यामुळे मंगळवारनंतरच संपावर तोडगा निघू शकतो हे स्पष्ट झाल्यामुळे रेशन दुकानदारांचा धीर सुटत चालला आहे. महिन्याचा पहिलाच आठवडा असल्याने रेशनवरील धान्य विक्रीसाठी हा आठवडा महत्त्वाचा असतो त्यामुळे बºयाचशा रेशन दुकानदारांनी संपाकडे पाठ फिरवून दुकाने सुरू केली आहेत. नाशिक जिल्ह्णात २६०९ रेशन दुकानदार असून, त्यापैकी १५०६ दुकानदार संपात सहभागी झाले असून, नाशिक, सिन्नर, नांदगाव, मालेगाव, बागलाण या तालुक्यातील दुकाने पूर्ववत सुरू झाले आहेत. येत्या दोन दिवसांत आणखी काही दुकानदार संपातून बाहेर पडण्याची शक्यता गृहीत धरून पुरवठा खात्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी सबुरीची भूमिका घेतली आहे, तर काही दुकानदारांनी कारवाईच्या भीतीपोटी संपातून माघार घेतली आहे. मात्र प्रशासन रेशन दुकानदारांवर दडपण आणत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाºयांनी केले आहेत.

 

Web Title: Half of the ration shopkeepers exit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.