शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

‘शुगर फ्री’ उत्पादनाचा अडीच लाखांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 01:45 IST

‘शुगर फ्री’ म्हणून गोल्ड टेबल टॉप स्विटनर्स या उत्पादनाच्या वेष्टणावरच उत्पादकाने एका बाजूला ‘शुगर फ्री’ तर दुसऱ्या बाजूला लॅक्टोज आणि डेक्सोट्रोज हे दोन साखरद्रव्ये वापरल्याचे नमूद केल्याचे आढळून आल्याने नाशिकमधून प्रशासनाच्या पथकाने सुमारे २ लाख ३९ हजार २८० रुपयांचा मोठा साठा जप्त केला आहे.

ठळक मुद्देएफडीएची कारवाई : नमुने तपासणीसाठी रवाना

नाशिक : ‘शुगर फ्री’ म्हणून गोल्ड टेबल टॉप स्विटनर्स या उत्पादनाच्या वेष्टणावरच उत्पादकाने एका बाजूला ‘शुगर फ्री’ तर दुसऱ्या बाजूला लॅक्टोज आणि डेक्सोट्रोज हे दोन साखरद्रव्ये वापरल्याचे नमूद केल्याचे आढळून आल्याने नाशिकमधून प्रशासनाच्या पथकाने सुमारे २ लाख ३९ हजार २८० रुपयांचा मोठा साठा जप्त केला आहे.अन्न व औषध प्रशासनाने पंचवटीमधील सुपर स्टॉकिस्ट मे. जे.के. अ‍ॅण्ड सन्स, रविवार कारंजावरील मे. प्रफुल्ल ट्रेडर्स या घाऊक व्यावसायिकांकडून प्रत्येकी अनुक्रमे १ लाख ३६ हजार २१० रुपये तर १ लाख ३ हजार ७० रुपये असा एकूण २ लाख ३९ हजार २८० रुपयांचा साठा जप्त केला आहे.साखरेऐवजी कृत्रिम गोडी आणणारे खाद्यपदार्थ वापरण्यात नागरिकांचा कल आहे. त्यामुळे अशा खाद्यपदार्थांमध्ये ‘शुगर फ्री टेबल टॉप स्विटनर’ हा एक प्रसिद्ध व नामांकित ब्रॅँड आहे. या ब्रँडनेही १०० टक्के सुरक्षित अशी जाहिरात करून विक्र ीवर भर दिला. मात्र त्यांच्या खाद्यपदार्थाच्या वेष्टणावर उत्पादनात अ‍ॅसपारटेम नावाचा घटक असल्याने लहान मुलांसाठी व फेनाईल केटोनोरीया या आजाराच्या रु ग्णांसाठी उत्पादन योग्य नसल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. सहायक आयुक्त सी. डी. राठोड, व सहआयुक्त सी. डी. साळुंके यांच्या आदेशान्वये ही कारवाई झाली.अन्नसुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर, संदीप देवरे यांनी रविवार कारंजा, पंचवटी परिसरातील दोन घाऊक व्यापाऱ्यांकडून या उत्पादनाचा मोठा साठा जप्त केला आहे. या उत्पादनाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढील तपास बाविस्कर व देवरे हे करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग